चिंचवड स्टेशन ते केएसबी चौक रस्त्यावरील खड्डे व वर आलेली खडी. 
पुणे

खडीच खडी चोहीकडे; रस्ता गेला कुणीकडे?

वैशाली भुते

पिंपरी - निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या सहा महिन्यातच चिंचवड स्टेशन ते केएसबी चौक रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील डांबराचा थर पूर्णपणे निघून गेला असून त्याखालील खडी सर्वत्र पसरली आहे. परिणामी, दुचाकीस्वारांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे. 

केएसबी चौकातील उड्डाण पुलाचा विकास पूर्ण झाल्यानंतर चिंचवड स्टेशन ते केएसबी चौकादरम्यानच्या रस्त्याचा विकास करण्यात आला. त्याअंतर्गत रस्त्याचे नव्याने डांबरीकरण केले. मात्र, पहिल्या पावसातच रस्त्यावरील डांबराचा थर वाहून गेला. त्यानंतर खडीही सुटी होऊन निघू लागली व सध्यस्थितीला ती सर्वत्र पसरली आहे. त्यामुळे वाहनचालकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

उखडलेला रस्ता
केवळ डांबर व खडीचा थरच नाही तर अनेक ठिकाणी रस्ताही उखडल्याचे पाहायला मिळत आहे. केएसबी चौकात शाहू महाराज पुतळ्यानजीक अनेक मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी पूर्ण रस्ता उखडला आहे. रात्रीच्या वेळी खडी व खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकीस्वारांना अपघात झाल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार आहे.

खडीचे ढीग 
या रस्त्यावरील चंद्रशेखर आझाद चौकाजवळ रस्त्यावर पसरलेल्या खडीचे प्रमाण सर्वाधिक आहे. किंबहुना रस्त्याच्या कडेला खडीचे ढीग लागले आहेत. मात्र, रस्त्याची सफाई करण्याची साधी तसदीही महापालिकेने घेतलेली नाही. या चौकापासून एक किलोमीटरवर असणाऱ्या महात्मा बसवेश्‍वर चौकापर्यंत खड्डे आणि खडीची मालिका कायम आहे. काही ठिकाणी डांबर व खडीने तग धरल्याने रस्त्याचा समतोल बिघडला आहे. उंचवटे व खड्ड्यांनी व्यापलेला हा रस्ता मृत्यूचा सापळा बनल्याची नागरिकांची भावना आहे. 

चिंचवड स्टेशन ते केएसबी रस्त्याच्या विकासासाठी मागील वर्षी तरतूद केली होती. नुकतीच त्याची निविदाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या रस्त्याचा समग्र विकास केला जाईल. दरम्यान, नागरिकांच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरूपात रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. मात्र, यंदा अतिरिक्त पाऊस झाल्याने रस्त्याचे नुकसान झाले.
- विजय भोजने, बीआरटी प्रवक्ता, पिंपरी-चिंचवड महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi Babri Masjid : बाबरी मशीद पाडल्यावर सोनिया गांधींना कोसळलेले रडू; भाजप नेते म्हणाले- काँग्रेसच्या हृदयात आजही बाबर जिवंत

Mohammed Shami शिवाय भारतीय वेगवान गोलंदाजी अपूर्ण, तो न्यूझीलंड दौऱ्यात हवा होता, रवी शास्त्री स्पष्टच बोलले

ST Bus Service :दिवाळीसाठी वाशीम आगारातून बसफेऱ्यांत वाढ;प्रवाशांच्या गर्दीचा विचार करून अतिरिक्त बससेवा

Latest Marathi News Live Update: अभिनेते रजनीकांत यांनी चेन्नईतील निवासस्थानाबाहेर चाहत्यांची घेतली भेट

IPL 2027 Trade: हार्दिक पांड्या ट्रेड होणार, पण कोणता खेळाडू मुंबई संघात येणार? MI आणि पंजाब किंग्समधील डील अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT