नवी दिल्ली - संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा करताना खासदार श्रीरंग बारणे. 
पुणे

रेड झोनबाबत संरक्षणमंत्र्यांशी चर्चा - श्रीरंग बारणे

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये संरक्षणविषयी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या संदर्भात खासदार श्रीरंग बारणे यांनी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन चर्चा केली. रेडझोन, बोपखेल येथील संरक्षण विभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याबाबत, मावळ येथील मिसाईल प्रकल्प व उरण येथील नौदल संवेदनशील भाग असे अनेक प्रश्न तपासून मार्गी लावले जातील, असे आश्‍वासन सीतारामन यांनी दिले. 

मनोहर पर्रीकर संरक्षणमंत्री असताना या प्रश्नांचा पाठपुरावा करत ते मार्गी लावण्यासाठी अनेक वेळा बैठका घेऊन गती देण्यात आली होती; परंतु पर्रीकर यांच्यानंतर हे प्रश्‍न पुन्हा मागे पडले आहेत. या पार्श्‍वभूमीवर बारणे यांनी संरक्षणमंत्र्यांशी चर्चा केली. 

बारणे म्हणाले, ‘‘पिंपरी- चिंचवडमधील रेड झोनची हद्द कमी करण्यासाठी मी अनेकदा संरक्षणमंत्र्यांबरोबर बैठक घेतल्या असून, त्याचा पाठपुरावा सातत्याने करत आहे. संरक्षणमंत्र्यांची भेट घेऊन या प्रश्नांचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून देऊन तत्कालीन संरक्षणमंत्री व मनोहर पर्रीकरांच्या बरोबर झालेल्या बैठकीचा वृत्तांतही दिला. बोपखेल पुलाबाबत काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने संरक्षण खात्याच्या जागेतून रस्ता करण्यास मान्यता देऊ नये, असा निकाल एका याचिकेच्या सुनावणीवेळी दिला. त्यामुळे हा प्रश्न अधिक जटिल झाला आहे. याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली आहे. मावळ येथील मिसाईल प्रकल्पासाठी अधिग्रहण केलेल्या जमिनीच्या शेतकऱ्यांबरोबर बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची मागणीही केली.’’ या प्रश्नासंदर्भात लोकसभेतही तारांकित प्रश्न उपस्थित केल्याचे त्यांनी सांगितले. उरण येथील नेव्हीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सेन्सिटिव्ह झोनमधील हद्द कमी करण्याबाबत चर्चा केल्याचे बारणे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT