पुणे

कोंडी सुटण्यास लागणार तीन महिने

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - एम्पायर इस्टेट येथील उड्डाण पुलावरील वाहतूक सुरू झाल्याशिवाय पिंपरी कॅम्पातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटणार नसल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले. एम्पायर इस्टेट पुलावरील वाहतूक सुरू होण्यास आणखी तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. दरम्यान, पिंपरीतील वाहतूक कोंडी समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.

भाजपच्या पिंपरीतील नगरसेविका कोमल मेवानी यांच्यासह काही स्थानिक नगरसेवकांनी पिंपरीतील वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित केला. 

मेवानी म्हणाल्या, ‘‘पिंपरीतील धोबीघाट, बाजारपेठ येथे वाहतुकीची कोंडी होते. गर्दीतून नागरिकांना चालणेही मुश्‍कील होते. खरेदीसाठी आलेल्यांचे हाल होतात. तसेच रस्त्यावरच वाहने पार्क केली जातात. त्यामुळे कोंडीतून सुटका करण्यासाठी या भागात पर्यायी वाहतूक व्यवस्था केली पाहिजे. येथील उड्डाण पूल जुना झाला आहे. त्यामुळे लगत समांतर उड्डाण पूल उभारता येईल का, त्या बाबत विचार करावा. विशेषतः पिंपरी बाजारपेठेत होणारी कोंडी सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत.’’ 

नगरसेविका आशा शेंडगे म्हणाले, ‘‘निगडी येथील उड्डाण पूल, भुयारी मार्ग तसेच रोटरीचा प्रकल्प वेळेत पूर्ण करावा. त्या बाबतच्या सूचना संबंधित ठिकाणी फलक लावून जाहीर कराव्यात. काम केव्हा सुरू केले, ते पूर्ण करण्याची मुदत, सध्या सुरू असलेल्या कामाची माहिती फलकावर नमूद केल्यास नागरिकांना माहिती मिळेल. याच पद्धतीने महापालिकेतर्फे शहरात सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती उपलब्ध करून द्यावी.’’

उपायांचा अहवाल सादर करा - सावळे
स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘महापालिकेने प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी नियोजन करून काम करावे. पिंपरीतील वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे. ती दूर करण्यासाठी उपाययोजना करावी. त्यासाठी त्या भागाची पाहणी करून तेथे योजावयाच्या उपायांचा अहवाल सादर करावा.’’

‘परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय’
आयुक्त हर्डीकर म्हणाले, ‘‘एम्पायर इस्टेट येथील उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून रॅम्पचे काम सुरू आहे. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर पिंपरीतील वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल. काळेवाडीकडे ये-जा करणारे वाहनचालक पिंपरीतील शगुन चौकातून उड्डाण पुलाकडे जातात. ते या पुलाचा वापर करतील. येत्या दोन-तीन महिन्यांत हा बदल होईल. त्यानंतरही वाहतुकीची कोंडी होऊ लागली, तर त्या वेळच्या परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय घेता येईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Leaders Join Congress : ममता बॅनर्जींना मोठा धक्का! १०० हून अधिक नेते-कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला; यावेळी भाजप नाही तर कॉंग्रेसमध्ये प्रवेश

आजचे राशिभविष्य - 29 सप्टेंबर 2026

आरोग्य‘चेतना’ : स्पायनल ट्युमरची अत्याधुनिक शस्त्रक्रिया

Maharashtra Weather : पावसाची पुन्हा एन्ट्री! राज्यातील ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट; तुमच्या भागात कसे असेल हवामान ?

US-China Trade Deal : अमेरिका-चीन ट्रेड वॉरला ब्रेक! ६० अब्ज डॉलरच्या व्यापारावर मोठा निर्णय, भारताची चिंता वाढली ?

SCROLL FOR NEXT