पुणे

वाहतूक नियमनासाठी व्हॉट्‌सॲपचा वापर

रवींद्र जगधने

पिंपरी - सोशल मीडियात प्रभावी असलेल्या व्हॉट्‌सॲपचा दुरुपयोग होतो, याबाबत कायमच ऊहापोह होतो. मात्र, सांगवी वाहतूक विभागाचे निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी वाहतूक नियमन व वाहतूक समस्या सोडवण्यासाठी व्हॉट्‌सॲपचा प्रभावी वापर सुरू केला आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

चौकात वाहतूक पोलिस, वॉर्डन नाही; वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग, नियमभंग करणारे वाहनचालक, अनधिकृत वाहतूक यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत कोठे तक्रार करायची, केली तर त्याची दखल घेतली जाईल का, असे अनेक प्रश्न नागरिकांना पडतात. मात्र, नागरिकांच्या प्रश्‍नांना तत्काळ प्रतिसाद मिळण्यासाठी निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी वाहतूक पोलिस, वॉर्डन व परिसरातील सुजाण नागरिक यांचा व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार केला आहे. 

सांगवी वाहतूक विभागाच्या कार्यक्षेत्रात चौक किंवा इतर कोठेही वाहतूक कोंडी, अपघात झाल्यास नागरिक ती माहिती व्हॉट्‌सॲप ग्रुपवर पोस्ट करतात. त्याला त्वरित ग्रुपवरील पोलिस, अधिकारी प्रतिसाद देत घटनास्थळी दाखल होतात. एखाद्या चौकात पोलिस नसल्यास नागरिकांनी ग्रुपवर ‘चौकात पोलिस नाहीत, वाहतूक कोंडी झाली आहे,’ अशी माहिती टाकल्यास तत्काळ संबंधित नेमणूक केलेला पोलिस ग्रुपवर माहिती देतो, की मी लंघुशंकेला गेलो होतो किंवा इतर कामासाठी बाजूलाच होतो, मी सध्या चौकात आहे. त्यामुळे तक्रार करणाऱ्या नागरिकाच्या समस्येचे तत्काळ निरसन होते. तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची माहिती मिळते. नवी सांगवी, जुनी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, रहाटणी, काळेवाडी हा परिसर सांगवी वाहतूक विभागाच्या अंतर्गत येत असून, म्हसवडे यांनी रुजू झाल्यानंतर सर्व सतरा सिग्नल सुरू केले.

नागरिकांचा पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा, तसेच नागरिकांच्या सहभागाने वाहतूक नियमन सुरळीत व्हावे, यासाठी व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार केला असून, या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
- किशोर म्हसवडे, सांगवी वाहतूक विभाग

वाहतूक पोलिस व दक्ष नागरिक यांचा व्हॉट्‌सॲप ग्रुप हा चांगला उपक्रम आहे. नागरिकांनी नियमभंग करणाऱ्या वाहनांचे छायाचित्र ग्रुपवर टाकल्यास वाहतूक विभागातर्फे कारवाई केली जाते. तसेच, कारवाईची माहिती ग्रुपवरच मिळते.
- पुरुषोत्तम पिंपळे, नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Price Hike : दूध महागणार! १ सप्टेंबरपासून प्रतिलिटर ९ रुपयांची वाढ; नवा दर किती?

Devdutta Padikkal Tattoo: बाबो! जर्सीचा नंबर अन् नाव थेट पाठीवर! पडिक्कलच्या टॅटू पाहून चाहतेही चक्रावले, म्हणाले, ‘ अरे हे काय!’

Animal Feed Poisoning: पशुखाद्यातून विषबाधा; गोणेवाडीत दोन जनावरे दगावली, दोन गंभीर; पशुपालकाला मोठा आर्थिक फटका

Marathi News Live Updates : रक्षाबंधनानिमित्त रामदास आठवलेंची कामाठीपुराला भेट; महिलांनी बांधली राखी

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात माणुसकीला लाज आणणारी घटना! मृत महिलेच्या कानातील सोन्याचे दागिने चोरले; VIDEO VIRAL होताच संतापाची लाट

SCROLL FOR NEXT