पुणे

रेड झोनमधील १८ हजार मिळकतींना करसवलत

CD

पिंपरी, ता. १ : रेड झोनबाधित मिळकतींच्या सामान्य करात ५० टक्के सवलत देण्याच्या निर्णयाची महापालिकेने अंमलबजावणी केली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार सहा विभागीय कार्यालयांतील १८ हजार ३३७ मिळकतींना या सवलतीचा लाभ मिळाला. संबंधित मिळकतधारकांना एकूण चार कोटी ८६ लाख रुपयांची सवलत देण्यात आली असून, त्यांच्याकडून १४ कोटी ५३ लाख रुपयांचा करभरणा झाला आहे.

शहरातील देहूरोड आयुध निर्माणी आणि दिघी मॅगझिन डेपोच्या रेड झोनमध्ये येणाऱ्या भागांत बांधकामांसह विकासावर अनेक निर्बंध आहेत. त्यामुळे या भागांत पुरेशा नागरी सुविधा देता येत नसल्याचे कारण देत महापालिकेने रेड झोनमधील निवासी आणि बिगरनिवासी मिळकतींच्या सामान्य करात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी एक एप्रिल २०२६ पासून सुरू झाली. ही सवलत संपूर्ण मिळकतकरावर नसून, केवळ सामान्य कराच्या रकमेत आहे.

सवलतीचा लाभ मिळविण्यासाठी मिळकतधारकाने ३१ मार्च २०२६ पर्यंतची संपूर्ण थकबाकी भरणे बंधनकारक करण्यात आले होते. महापालिकेने निर्णय घेताना सुमारे ४३ हजार ५६२ मिळकतींना त्याचा लाभ होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, उपलब्ध आकडेवारीत प्रत्यक्ष लाभार्थी मिळकतींची संख्या १८ हजार ३३७ आहे. त्यामुळे महापालिकेने ४३ हजार मिळकतीधारकांना लाभ होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष लाभार्थी यांच्यात २५ हजार २२५ मिळकतींची तफावत दिसून येते.

तळवड्यात सर्वाधिक लाभार्थी
तळवडे विभागातील सर्वाधिक १३ हजार ४७१ मिळकतींना तीन कोटी ६३ लाख रुपयांची सवलत मिळाली. त्यांच्याकडून नऊ कोटी ९० लाख रुपयांचा कर जमा झाला. चिखलीतील तीन हजार ५८५ मिळकतींना ९३ लाखांची सवलत मिळाली असून, तीन कोटी ५७ लाखांचा भरणा झाला. एकूण लाभार्थी मिळकतींपैकी सुमारे ९३ टक्के मिळकती तळवडे आणि चिखली विभागातील आहेत.

रेड झोनमधील सर्व पात्र मिळकतींना सवलत दिल्यास महापालिकेच्या वार्षिक उत्पन्नावर सुमारे १२ कोटी रुपयांचा परिणाम होण्याचा प्राथमिक अंदाज होता. प्रत्यक्षात आतापर्यंत ४.८६ कोटी रुपयांची सवलत देण्यात आली आहे. या आर्थिक वर्षातील भरणा करण्यासाठी अजून, सहा महिने बाकी आहेत. सामान्य करातील सवलतीमुळे उत्पन्नात घट झाली असली, तरी थकबाकी भरण्याची अट असल्याने करवसुली होत आहे.
- सचिन पवार, उपायुक्त, महापालिका
---
आम्ही रेडझोन बाधित परिसरात राहत आहोत. आमच्या परिसरात काही ठिकाणी रस्ते नाहीत. कचराही वेळेवर उचलला जात नाही. त्या अडचणीही महापालिकेने सोडवाव्यात. ही सूट सामान्य फक्त सामान्य करातच आहे. मात्र, त्यासाठी आधीची थकबाकी भरण्याची अट आहे. इतर करातही सूट मिळाली तर परिसरातील कराचा भरणा वाढेल.
- आकाश वाघ, तळवडे

---
सवलतीचा विभागनिहाय आढावा
विभागीय कार्यालय ः मिळकती ः सवलत ः भरलेली रक्कम
- किवळे ः ४६५ ः ८ लाख ः ३१ लाख
- चिखली ः ३,५८५ ः ९३ लाख ः ३.५७ कोटी
- तळवडे ः १३,४७१ ः ३.६३ कोटी ः ९.९० कोटी
- दिघी-बोपखेल ः ४७ ः १ लाख ः ३ लाख
- निगडी-प्राधिकरण ः २६१ ः ३ लाख ः १४ लाख
- भोसरी ः ५०८ ः १८ लाख ः ५८ लाख
- एकूण ः १८,३३७ ः ४.८६ कोटी ः १४.५३ कोटी

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, मराठा आंदोलकांकडून शोले स्टाईल आंदोलन

Diet Tips: ट्रेकिंग करताना काजू-बदाम खाताय? हाय अल्टीट्यूडवर ड्रायफ्रूट्स खाणे धोकादायक! वाचा तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

Retirement Planning: 60 नाही, 43 व्या वर्षीच रिटायरमेंट! 85 लाखांचा फंड अन् 39 हजार भाडे, कपलचा प्लॅन नेमका काय?

का मोडला 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा संसार? म्हणाली, 'एखाद्याला निघून जायचं असतं तेव्हा...'

मंगळ-बुधाचा विशेष योग! करिअर अन् पैशांच्या बाबतीत चमकणार ‘या’ राशींचे नशीब?

SCROLL FOR NEXT