पुणे

पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या बसला अपघात

CD

पिंपरी, ता. १२ ः चिंचवड येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या बसचा सोमवारी (ता. १२) दुपारी दीडच्या सुमारास काळेवाडी, तापकीर चौकाजवळ अपघात झाला. या अपघातात चालक आणि महिला परिचालक किरकोळ जखमी झाले असून, बसमधील विद्यार्थीही प्रचंड घाबरले होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतही बसमध्ये विद्यार्थी असल्याचे स्पष्ट दिसत असताना पोलिसांनी मात्र बसमध्ये विद्यार्थी नसल्याचा दावा केला आहे. यावरून पोलिसांच्या कार्यवाहीबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.

काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता (चिखली) बीआरटी मार्गावरुन चिंचवडच्या दिशेने जाणाऱ्या शालेय बसचा (बस क्र. एमएच ०२ बीक्यू १०८७) तापकीर चौकाजवळ अपघात झाला. चालकाला फीट आल्यामुळे बस बीआरटी मार्गाच्या लोखंडी गर्डरला धडकली. बसमध्ये एक महिला परिचालक आणि सुमारे सहा ते सात विद्यार्थी होते. बस अचानक गर्डरला धडकल्यामुळे मोठा आवाज झाला. त्यामुळे बसमधील विद्यार्थी प्रचंड घाबरले होते. अपघातात महिला परिचालक किरकोळ जखमी झाली असून, बसमधील विद्यार्थीही पुढेच्या सीटला आदळले. अपघातानंतर लगेच परिसरातील नागरिकांनी बसकडे धाव घेतली. त्यावेळी चालक बसच्या दरवाज्यावर शांत पडून होते. नागरिकांनी चालकाला बस खाली उतरून बाजूला बसवले. तोपर्यंत पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त बस बाजूला काढून वाहतूक मोकळी केली.

अपघातानंतर बस घेऊन चालक फरारी
कोणताही अपघात झाल्यानंतर पोलिस ते वाहन अडवून ठेवतात किंवा जवळील पोलिस स्टेशनमध्ये घेऊन जातात. सोमवारी अपघातानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त बस पोलिस स्टेशनला घेऊन जाण्याऐवजी ती सोडून दिली. गाडी मालक ती बस घेऊन पसार झाला. सायंकाळी पाचपर्यंत ती बस पोलिस स्टेशनमध्ये जमा केली नव्हती.

विद्यार्थ्यांना शाळेत सोडून ती बस चिंचवड येथील शाळेत जात होती. अपघात झाला तेव्हा त्याबसमध्ये विद्यार्थी नव्हते. चालकाला चक्कर आल्यामुळे ती बस रस्ता दुभाजकाला धडकली.
- अस्लम मुजावर, पोलिस उपनिरीक्षक

सकाळचे काही प्रश्‍न
- अपघातानंतर पोलिसांनी बस जाऊ का दिली?
- बसमध्ये विद्यार्थी असताना पोलिस विद्यार्थी नसल्याचा दावा कशावरून करत आहेत?
- अपघातानंतर सुमारे पाच तास ती बस कुठे होती?
- अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती, व्हिडिओ आणि पोलिसांच्या माहितीत तफावत कशी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

Akola Crime : कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ‘एलसीबी’कडून सहा तासांत तीन आरोपी अटकेत, १८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

INS Mangrol : मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘आयएनएस मंगरोल’चे बळ!

SCROLL FOR NEXT