पिंपरी, ता. ९ ः शहरातील यशवंतनगर, अजमेरा कॉलनी, चिखली आणि मोशी परिसरातील लिगसी रिव्हर साईड, मिलिनीयम मॅनोरे, वास्तू ड्रीम, ऐश्वर्यम हमार, रिव्हर साइड रेसिडेन्सी या सोसायटीच्या आवारात भटक्या श्वानांचा वावर वाढला आहे. यामुळे रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी श्वानांचे टोळके नागरिकांच्या अंगावर धावून जाणे, दुचाकीस्वारांचा पाठलाग करणे, लहान मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना घाबरवणे तसेच चावा घेण्याच्या घटना घडत आहेत. सकाळ-सायंकाळ फिरत असताना भटक्या कुत्र्यांचा धोका कायम असतो. त्यामुळे नागरिकांनी भीतीच्या वातावरणात जगायचे का? असा संतप्त सवाल निर्माण झाला आहे
नागरिकांच्या मागण्या
- सोसायटी परिसरातील भटक्या श्वानांचे सर्वेक्षण करावे
- निर्बिजीकरण व लसीकरणाची विशेष मोहीम राबवावी
- श्वानांबाबत नियमांनुसार योग्य कार्यवाही करावी.
- नागरिकांच्या तक्रारींसाठी विशेष हेल्पलाइन/तक्रार नोंदणी व्यवस्था अधिक प्रभावी करावी
- तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित पथकाने ठराविक कालमर्यादेत घटनास्थळी जाऊन कार्यवाही करावी
भटक्या श्वानांमुळे सोसायटी परिसरातील नागरिक, विशेषतः लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षितता धोक्यात आली आहे. सोसायट्यांमध्ये कचरा व अन्न कचरा उघड्यावर पडणार नाही, यासाठी संबंधित विभागाने प्रभावी उपाययोजना करावी.
- विनोद वरखडे पाटील, सोसायटीधारक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.