पुणे

‘संरक्षण’मुळे मेट्रोचा मार्ग मोकळा

सकाळवृत्तसेवा

पुणे - संरक्षण खात्याचा अडथळा दूर झाल्यामुळे पिंपरी-स्वारगेट मेट्रो मार्गाच्या कामाला आता वेग येणार आहे. सुमारे पावणेदोन किलोमीटरच्या अंतरात मेट्रो मार्ग आणि रेंजहिल्स स्थानकासाठी सुमारे ८५ खांब महामेट्रोला उभारायचे आहेत. त्यासाठीचे काम पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. 

पिंपरी-स्वारगेट हा मार्ग सुमारे १६.५८९ किलोमीटरचा आहे. त्यातील ११.५० किलोमीटरचा मार्ग एलिव्हेटेड; तर ५ किलोमीटरचा मार्ग भुयारी आहे. एलिव्हेटेड मेट्रोसाठी मार्ग उभारणीचे काम सुरू असताना, रेंजहिल्स ते दापोडीदरम्यानच सुमारे पावणेदोन किलोमीटरचा मार्ग हा संरक्षण खात्याच्या अखत्यारीत असलेल्या संस्थांच्या कार्यक्षेत्रातून जात आहे. त्यांची परवानगी मिळावी म्हणून महामेट्रो गेले १० महिने संरक्षण खात्याकडे पाठपुरावा करीत होती. त्यासाठी अखेर गुरुवारी रात्री परवानगी मिळाली. 

दरम्यान, महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी संरक्षण खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांची शुक्रवारी भेट घेतली; तसेच काम कोठून आणि कसे सुरू होणार, याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. आता काम पुढील आठवड्यात म्हणजेच गणेश विसर्जनानंतर सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात रेंजहिल्स ते खडकी आणि त्यानंतर खडकी ते दापोडीदरम्यान काम सुरू होईल, असे महामेट्रोच्या प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. 


 पिंपरी-स्वारगेट मार्गावर बोपोडीपर्यंत मेट्रो मार्ग उभारण्यासाठी २०० खांबांचे फाउंडेशन पूर्ण झाले आहे; तर १६५ खांब उभारून झाले आहेत. संत तुकारामनगर, पिंपरी महापालिका, फुगेवाडी आणि कासारवाडी या स्थानकांचीही कामे सुरू आहेत. 
 खडकीजवळील सुमारे ८०० मीटर जागेवरूनही मेट्रोचा मार्ग जाणार आहे. त्याच रस्त्यावर बीआरटी मार्गही प्रस्तावित आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका संरक्षण खात्याकडे पाठपुरावा करीत आहे; परंतु त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. या जागेवर मेट्रोच्या सुमारे ३० खांबांचे नियोजन आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithan-Sambhajinagar Highway Crash: पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; अर्धवट रस्त्याच्या कामामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू

आदिवासी विद्यार्थ्यांचं पुण्यातील आंदोलन स्थगित! 'वर्षा' बंगल्यावर आंदोलन करण्याचा उपोषणकर्त्यांचा इशारा

Rahul Gandhi: ''काँग्रेसचा इतिहासच दलितविरोधी'', राहुल गांधींच्या आरोपांनंतर भाजपचा जोरदार पलटवार

ISRO GSLV F-17 launch: आठ महिन्यांनंतर इस्रोची उड्डाणशृंखला पुन्हा सुरू; जीएसएलव्ही एफ-१७ वरून भूस्थिर कक्षेत ईओएस-०५ दूरसंवेदन उपग्रहाचे ४ सप्टेंबरला प्रक्षेपण

Nepal Flood Miracle Rescue: नेपाळच्या महापुरातून ९७ वर्षीय गुणा माया बोहरांची चमत्कारिक सुटका; ढिगाऱ्यांतून फुललेली जगण्याची उमेद

SCROLL FOR NEXT