पुणे

बांधकाम साइटवरून साहित्य चोरीला

CD

पिंपरी : बांधकाम साइटवरून साहित्य चोरल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना मोशी येथे घडली. या प्रकरणी भगवान दशरथ लवंगारे (रा. सहयोगनगर, तळवडे, मूळ- सातारा) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी लक्ष्मण रमेश माने (रा. पिंपरी) व इतर तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे एका ठिकाणी सुरक्षारक्षकाची ड्यूटी करीत असता रिक्षातून आलेल्या आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी करून शेजारील बांधकाम साइटवरून ८० हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले.

मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हा
पिंपरी : विधिसंघर्षित मुलाला शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना चिखलीतील नेवाळे वस्ती येथे घडली. या प्रकरणी विधिसंघर्षित मुलाने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विशाल डाबेराव, ओंकार वाळुंज, रोहन पाटील व एका अज्ञात मुलावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून दगड, कमरेचा बेल्ट तसेच गाडीच्या चावीने पाठीवर, डोक्यात व छातीवर मारहाण करून दुखापत केली. तसेच तू जर परत दिसला तर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली. दरम्यान, फिर्यादीचा मित्र त्याला सोडविण्यासाठी आला असता त्यालाही मारहाण करून दुखापत केली.

घरातून लॅपटॉप चोरीला
पिंपरी : उघड्या दरवाजावाटे घरात शिरलेल्या चोरट्याने चाळीस हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरला. ही घटना पिंपळे गुरवमधील काटेपुरम चौक येथे घडली. या प्रकरणी ईश्वर कर्डिले (रा. ओंकार हाईट्स, काटेपुरम चौक, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

तलवार बाळगणाऱ्यावर कारवाई
पिंपरी : बेकायदारित्या तलवार जवळ बाळगणाऱ्यावर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीकडून एक तलवार पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई वाकडमधील दत्त मंदिर रस्ता येथे करण्यात आली. वैभव भारत जाधव (रा. लोंढे वस्ती, ताथवडे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या आरोपीकडून पोलिसांनी एक तलवार जप्त केली आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रम्प यांच्यासोबत दिवाळी साजरी करणारे विशाल गोंडल कोण? हनुमान चालीसाही दिली भेट

Mumbai Local: चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये थरार! दोन प्रवाशांमध्ये जबर मारहाण, धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेमकं काय घडलं?

Sayaji Shinde Karjat Tree Felling Protest News : "पर्यावरण मंत्र्यांना पर्यावरणाचा किती गंध आहे?"; अभिनेते सयाजी शिंदे यांचा कर्जतमधील वृक्षतोडीवरून सरकारवर घणाघात

Latest Marathi News Live Update: अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रूटच्या मालमत्तेवर ईडीची मोठी कारवाई

Pune Metro: दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल; ८ नोव्हेंबरला रात्री ८ नंतर सेवा बंद

SCROLL FOR NEXT