पिंपरी, ता. ३ : ‘‘विविध विभागांकडून प्राप्त होणारी माहिती हा नियोजनाचा गाभा आहे. त्यामुळे ही माहिती संबंधित विभागप्रमुखांनी प्रत्यक्ष तपासून आणि प्रमाणित करूनच सादर करावी. जेणेकरून भविष्यातील ‘स्ट्रक्चरल प्लॅन’च्या नियोजनात कोणतीही त्रुटी राहणार नाही,’’ अशा स्पष्ट सूचना ‘पीएमआरडीए’ आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी अधिकाऱ्यांना दिले.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्राच्या विकासासाठी तयार करण्यात येणाऱ्या ‘प्रारूप संरचना योजने’च्या (स्ट्रक्चरल प्लॅन) कामाबाबत आयुक्तांनी माहिती घेतली. ही योजना अधिक परिपूर्ण करण्यासाठी आवश्यक अचूक माहिती आणि आगामी २० वर्षांचे नियोजन सर्व संबंधित शासकीय विभागांनी येत्या आठ दिवसांत सादर करावे. मंजूर, विद्यमान आणि प्रस्तावित प्रकल्पांच्या माहितीचा समावेश असावा, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
‘पीएमआरडीए मध्ये झालेल्या या बैठकीत जिल्हा परिषद, महापालिका, पोलिस, एमआयडीसी, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन महामंडळ, महापारेषण, पुणे मेट्रो, पीएमपी आणि रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत रूपरेषेवर सादरीकरण करण्यात आले. विविध विभागांमधील समन्वय आणि तांत्रिक बाबींवर सखोल चर्चा झाल्यानंतर आयुक्तांनी माहिती संकलनाबाबत सूचना दिल्या. ही माहिती नियोजन विभागाकडे सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
माहिती संकलनात कोणतीही गळती किंवा अनधिकृत हस्तक्षेप होऊ नये, यासाठी प्रत्येक विभागाने तत्काळ एका ‘नोडल अधिकाऱ्याची’ नियुक्ती करावी, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या. नियुक्त अधिकाऱ्यांमार्फतच पत्रव्यवहार व माहितीची देवाणघेवाण करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.