पिंपरी : ‘तू मला शिवी का दिली’, असे खोटे बोलून एकाला मारहाण करीत हाताला चावा घेतला. ही घटना रावेत येथील शिंदे वस्ती येथे घडली. या प्रकरणी देवेंद्र फुलसिंग शर्मा (रा. शिंदे वस्ती, रावेत) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात दुचाकी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे रावेत येथून घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या आरोपीने ‘तू मला शिवी का दिली’ असे खोटे बोलून फिर्यादी यांना शिवीगाळ व हाताने मारहाण केली. फिर्यादीच्या हाताला चावा घेऊन डोक्यात दगड मारून दुखापत केली.
मारहाणप्रकरणी एकावर गुन्हा
पिंपरी : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सुरक्षारक्षकाला मारहाण करण्यात आली. ही घटना चिंचवड, लिंकरोड येथे घडली. या प्रकरणी दगडू नागनाथ साबळे (रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अजय शेलार (रा. लिंकरोड, चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे ड्यूटीवर असताना त्यांच्या ओळखीचे अविनाश मंडले व आरोपी यांचे आपापसात घरगुती कारणावरून भांडण सुरू होते. दरम्यान, फिर्यादी भांडण सोडविण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांना हातातील कड्याने मारून जखमी केले.
कोयत्याच्या धाकाने दहशत माजविणाऱ्यांना अटक
पिंपरी : कोयत्याचा धाक दाखवून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना काळेवाडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई नाणेकर चौक परिसरात करण्यात आली. शिवराज ज्ञानदेव चव्हाण (रा. नखातेवस्ती, रहाटणी) व वैष्णव उर्फ रोहन सुनील जाधव (रा. रहाटणी फाटा) अशी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. या आरोपींनी हातात कोयते घेऊन रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कोयत्याचा धाक दाखवत दहशत निर्माण केली. त्यांच्याकडून दोन कोयते जप्त करण्यात आले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.