पिंपरी, ता. १४ : पिंपरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे निवासस्थान स्थलांतरित करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीवर नमुना अर्ज सादर करताना त्रयस्थ व्यक्तींनी चार मोबाइल क्रमांकांद्वारे ४० मतदारांचे नमुना अर्ज ऑनलाइन भरल्याचे उघड झाले. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
पिंपरी चिंचवडचे अपर तहसीलदार तथा पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी जयराज देशमुख यांनी निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार चार वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकधारकांविरुद्ध पोलिसांनी लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ अन्वये गुन्हा दाखल केला. ऑक्टोबर २०२४ मध्ये मतदारांचे निवासस्थान स्थलांतरित करण्यासाठी ERONET 2.0 या ऑनलाइन प्रणालीवर नमुना फॉर्म क्रमांक ८ चे अर्ज सादर झाल्याचे देशमुख यांच्या निदर्शनास आले. प्राथमिक पडताळणीदरम्यान ५ ऑक्टोबर २०२४ रोजी त्रयस्थ व्यक्तींनी चार मोबाइल क्रमांकांचा वापर करून ४० मतदारांचे अर्ज ऑनलाइन भरल्याचे समोर आले. ५ ऑक्टोबरला एका मोबाइल क्रमांकावरून १०, दुसऱ्या मोबाइल क्रमांकावरून २६ अर्ज, अन्य एका मोबाइल क्रमांकावरून ३ अर्ज तसेच, १६ ऑक्टोबरला आणखी एका मोबाइल क्रमांकाद्वारे एक अर्ज ऑनलाइन भरल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार, देशमुख यांनी १ नोव्हेंबर रोजी तक्रार दिली.
-----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.