पुणे

कचरा प्रक्रिया केंद्रांच्या ‘डीपीआर’ला मुहूर्त

CD

पिंपरी, ता. ७ ः पिंपरी चिंचवड शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी विविध दहा ठिकाणी अत्याधुनिक कचरा प्रक्रिया केंद्र महापालिका उभारणार आहे. दुर्गंधीमुक्त केंद्रांसाठी जागा निश्चित केलेल्या आहेत. त्यांचे सविस्तर प्रकल्प आराखडे (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू आहे. शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि मोशी कचरा डेपोवरील ताण कमी करण्यासाठी लवकरात लवकर प्रक्रिया प्रकल्प उभारणे आवश्यक आहे.
मोशी कचरा डेपोतील जुन्या कचऱ्याच्या डोंगराचा काही भाग कोसळून वेस्ट टु एनर्जी प्रकल्पाची इमारत आठ जुलै रोजी पडली होती. त्याखाली सापडून नऊ कामगारांचा मुत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे डेपो बंद होता. त्यामुळे कचरा टाकणेही बंद होते. परिणाम शहरातील मोकळ्या जागांवर कचरा संकलन सुरू केले होते. आता तेथील कचरा उचलला जात आहे. मात्र, शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर त्याच भागात प्रक्रिया करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला आहे. त्यासाठी दहा क्षेत्रीय कार्यालयस्तरांवर सुमारे ४० जागा बघितल्या होत्या. त्यातील दहा जागा निश्चित केल्या असून त्यांवर दुर्गंधीमुक्त कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले आहे.

कचरा प्रक्रिया केंद्र का?
- घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी, शाश्वत आणि विकेंद्रित पद्धतीने करण्यासाठी
- मोशी कचरा डेपोवरील कचऱ्याचा वाढता भार कमी करण्यासाठी
- प्रभाग स्तरावर घनकचरा व्यवस्थापनाची यंत्रणा सक्षम करण्यासाठी
- मोशी डेपोतील जागा अपुरी पडत असल्याने कचऱ्याचे प्रभागनिहाय विकेंद्रीकरण करण्यासाठी

असे आहे नियोजन
- प्रस्तावित जागांवर क्षेत्रफळानुसार विविध प्रकारच्या घनकचरा प्रक्रिया सुविधा विकसित करणे
- कचऱ्याचे वर्गीकरण व पुनर्वापर, उर्जा निर्मिती करणे
- जैविक कचऱ्यापासून बायोगॅस व बायोफ्युएल निर्मिती करणे
- प्लास्टिक कचऱ्यापासून विविध उत्पादने तयार करणे

विचाराधीन जागा
प्रभाग १३ मध्ये निगडी प्राधिकरण सेक्टर क्रमांक २२, प्रभाग १७ मध्ये चिंचवडमधील आरक्षण १/८९, प्रभाग १८ मध्ये चिंचवडमधील आरक्षण क्रमांक २२१, प्रभाग १० मधील दत्तनगर, दिघीतील सर्व्हे क्रमांक ७७, चोविसावाडीतील आरक्षण क्रमांक २/१६, पुनावळेतील सर्व्हे क्रमांक २३ व २६ मधील काही भाग, गवळीमाथा, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील कासारवाडीतील जागा.

अत्याधुनिक दुर्गंधीमुक्त कचरा प्रक्रिया केंद्रासाठी प्रस्तावित जागांच्या क्षेत्रफळानुसार नियोजन केले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुर्गंधविरहित ट्रान्स्फर स्टेशन, मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी, बायोगॅस, बायोफ्युएल, प्लास्टिकपासून उपयुक्त उत्पादने तयार करण्यासंदर्भातील विविध प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. प्रत्येक जागेची तांत्रिक व व्यवहार्यता तपासणी करून डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरात लवकर प्रकल्प उभारून कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.
- कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Jantar Mantar Protest: शनिवारी सीजेपीचं पुन्हा 'जंतरमंतर'! मुख्य प्रवक्ते सौरव दास दिल्ली पोलिसांच्या भेटीला, म्हणाले...

IND vs WI 2nd T20I: नितीश रेड्डी, प्रिन्स यादव IN, वैभव सूर्यवंशी बाकावरच; दुसऱ्या ट्वेंटी-२० साठी Playing XI मध्ये सूचवला बदल

Sangli District Bank Election : आमदार सुरेश खाडेंसह सात जणांचे अर्ज बाद; पडळकर, विशाल पाटील, देशमुख यांना दिलासा, 21 जागांसाठी 295 अर्ज

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावाच लागेल - राहुल गांधी

थिएटर फुटलं, अंधारातून पळालो, नानाने मला रिक्षात टाकलं अन् स्वतः... अशोक मामांनी सांगितला तो प्रसंग, काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT