पुणे

पाण्याचा गैरवापर केल्यास कारवाई

CD

पिंपरी, ता. १५ : ‘‘अपुऱ्या पावसामुळे पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर अत्यंत जबाबदारी आणि काटकसरीने करावा,’’ असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
शासनाच्या आदेशानुसार शुक्रवारपासून (ता.१६) शहराच्या पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणी कपात केली जाणार आहे. शिवाय, पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी प्रभाग स्तरावर विशेष तपासणी पथके नियुक्त केली आहेत. पाण्याचा गैरवापर आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. उपलब्ध पाणीसाठा ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरावा, यासाठी १० टक्के कपातीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

आज वाचविलेला प्रत्येक थेंब उद्याची आणि पुढील वर्षाची पाणी सुरक्षितता निश्चित करेल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर आवश्यक तेवढाच करावा. पाण्याचा अपव्यय टाळावा आणि पाणी बचतीच्या प्रयत्नांत महापालिकेला सहकार्य करावे.
- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, महापालिका

महापालिका म्हणते...
- गृहनिर्माण सोसायट्यांनी उद्याने, हिरवळी आणि झाडांना पिण्याच्या पाण्याऐवजी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील (एसटीपी) प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर करावा. एसटीपी बंद ठेवणाऱ्या सोसायट्यांचे नळजोड कायमस्वरूपी बंद करण्यात येतील.
- सर्व्हिस सेंटरमध्ये अनधिकृतरीत्या पिण्याच्या पाण्याचा नळजोड तातडीने बंद करण्यात येऊन संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. वाहन धुणे, टेरेस आणि अंगण धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये
- नवीन गृहप्रकल्पांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने त्यांना पिण्याच्या पाण्यापुरते मर्यादित व्यासाचे नळजोड देण्यात येतील. तेथे विद्युत पंप लावून पाणी उपसा करणाऱ्यांचे पंप जप्त करून दंडात्मक कारवाई केली जाईल. वॉशिंग सेंटर आणि इतर मोठ्या व्यावसायिक प्रकल्पांना नवीन नळजोड दिले जाणार नाहीत.
- व्यावसायिक आस्थापना, बांधकाम प्रकल्प आणि इतर बिगर घरगुती वापरकर्त्यांनी आवश्यक पाण्याची व्यवस्था स्वतःच्या स्तरावर करावी. घरगुती वापर, शाळा आणि रुग्णालये यांव्यतिरिक्त इतर कारणांसाठी पिण्याच्या पाण्याचा गैरवापर होत असल्याचे आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.
- इमारतींवरील पाण्याच्या टाक्यांमधून पाणी वाहून जाणार नाही किंवा गळती होणार नाही, याची दक्षता घ्यावी. रस्त्यावरील पाणीपुरवठ्याच्या वाहिन्यांमधून होणारी गळती निदर्शनास आल्यास तातडीने पाणीपुरवठा विभागाला कळवावे.
- भूजलपातळीही पुरेशी नसल्याने बोअरवेलच्या पाण्याचा वापर जपून आणि आवश्यक तेवढाच करावा. बांधकामासाठी बोअरवेलच्या पाण्याचा वापर न करता महापालिकेच्या एसटीपीमधून उपलब्ध होणाऱ्या प्रक्रियायुक्त पाण्याचाच वापर करावा
- नदीतून अनधिकृत पाणी उपसून विहिरीत किंवा टाकीत साठवून टँकरद्वारे विक्री करणे तातडीने बंद करावे. असे आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल.
- काटकसरीने आणि नियोजनबद्ध पाणी वापर करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांचा महापालिका सन्मान करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Backlash : "व्ह्यूजसाठी इतक्या खालच्या पातळीला..."; पत्नीला पाळीव कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजले, यूट्यूबर सौरभ जोशीवर नेटकरी भडकले!

Jailer 2 Movie Review : रजनीकांतच्या 'जेलर २'चा प्रेक्षकांवर प्रभाव कसा? वाचा रिव्ह्यू

Latest Marathi News Update: कॅफेबाहेर खुनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या आरोपीला अटक

Hingoli District Earthquake : हिंगोली जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर २.९ तीव्रतेची नोंद

IND vs WI : अर्शदीप सिंग पाचव्या T20I मधून बाहेर गेला, तर त्याची जागा कोण घेणार; ३६ वर्षीय गोलंदाजाच्या कमबॅकची तुफान चर्चा

SCROLL FOR NEXT