पुणे

बोरीत फुलली गुलाबी द्राक्षे

CD

द्राक्षे म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते... काळी द्राक्षे...पिवळी द्राक्षे...ही द्राक्षे आपण आवडीने खात असतो. मात्र गुलाबी द्राक्षे खाण्याच्या संधी आपल्याला कधी मिळाली आहे का? गुलाबी द्राक्षांची चव चाखली नसेल तर येणाऱ्या द्राक्षाच्या हंगामात आपल्याला निश्‍चित गुलाबी गोड द्राक्षे खाता येणार आहेत. यासाठी मात्र तुम्हाला इंदापूर तालुक्यातील बोरी गावामध्ये यावे लागेल. कारण येथील युवा प्रगतशील शेतकरी संदीप मदन शिंदे यांनी द्राक्षशेतीवर संशोधन करून एसएमएस-५५ हे नवीन द्राक्षाचे वाण तयार केले आहे.
- राजकुमार थोरात

गुलाबी द्राक्षे इतर द्राक्षांच्या तुलनेमध्ये अधिक स्वादिष्ट व चवदार आहेत. देशभरातील बाजारपेठेत सध्या गुलाबी द्राक्षाला मागणी वाढत चालली आहे.

बोरी गाव द्राक्षाचे आगार
इंदापूर तालुक्यातील बोरी गावाला द्राक्षाचे आगार म्हटले जाते. येथील बहुतांश शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय असून प्रत्येकाच्या घरी द्राक्षाच्या बागा आहेत. बोरी गावातील पूर्वेकडील भागामध्ये माळरान होते. पूर्वी या ठिकाणी माळरानावर मोठमोठे दगडधोंडे होते तसेच दगडामध्ये कुसळे (गवत) उगवत होते. मात्र बोरीतील शेतकऱ्यांनी कष्टाच्या जोरावर माळरानावरील दगडालाही पाझर फोडून माळरानामध्ये द्राक्षाचे मळे फुलवले आहेत. पाण्याची उपलब्धता कमी असल्याने शेतकऱ्यांनी शेततळी उभारली असून शेततळ्याच्या माध्यमातून शेती करत असतात. बोरीमधील १०० टक्के द्राक्ष शेती ठिबक सिंचनावर आहे.

प्रगतशील शेतकरी कुटुंब
बोरीमधील दिवंगत कृष्णा शिंदे यांचे प्रगतशील कुटुंब म्हणून गावामध्ये परिचित आहे. कृष्णा शिंदे यांचे पुत्र मदन शिंदे व गणपत शिंदे यांनीही कष्टाने शेती पिकवली. आता तरुण पिढी शेती व्यवसायामध्ये आली आहे. संदीप शिंदे व त्यांच्या बंधूंनी शेती व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवनवीन प्रयोग करीत आहेत.

द्राक्ष शेती १७० एकरवर
संदीप शिंदे यांच्यासह घरातील युवकांनी शेती व्यवसाय अधिक उंचीवर नेला आहे. शिंदे यांचे कुटुंब सुमारे १७० एकर द्राक्षाची शेती करीत आहे. शेती करत असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, औषध फवारणीच्या नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आहे. कष्ट हेच शेतकऱ्यांचे भांडवल आहे. अख्खे कुटुंब सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतीत राबत असते.

पिंक द्राक्षाच्या वाणाची निर्मिती
संदीप मदन शिंदे यांनी द्राक्ष शेती करत असताना द्राक्ष पिकाचा सर्वांगीण अभ्यास केला. त्यांनी द्राक्षाच्या नवीन वाणाची निर्मिती केली आहे. माणिक चमन या पिवळसर पांढऱ्या रंगाच्या द्राक्षापासून गुलाबी द्राक्षाचे वाण विकसित केले. द्राक्ष वाण विकसित करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र बारामती व महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे यांचे मार्गदर्शन लाभले.

एसएमएस - ५५ द्राक्षाचे नवीन वाण
द्राक्षाची शरद सिडलेस, कृष्णा सिडलेस, नानासाहेब जंबो, माणिकचमनसह अनेक प्रकार आहेत. संदीप मदन शिंदे यांनी विकसित केलेल्या द्राक्षाच्या वाणास एसएमएस - ५५ हे नाव दिले आहे. बोरीच्या मातीमधील विकसित व्हरायटी असल्यामुळे याची चव वेगळीच आहे. या द्राक्षाचा रंग गुलाबी असल्यामुळे द्राक्षे दिसायला आकर्षक आहेत. द्राक्षे पाहता क्षणी खाण्याचा मोह होतो. ग्राहकांसाठी ही द्राक्षे वेगळाच अनुभव देतात. यामध्ये साखरेचे प्रमाण २४ ते २६ ब्रिक्स असून चवीला गोड आहेत.

कमी खर्चात लागवड शक्य
एसएमएस-५५ ही द्राक्षे कमी खर्चामध्ये लागवड करणे शक्य असल्यामुळे शेतकऱ्यांना परवडणारे आहे. तसेच या वाणाची रोगप्रतिकार शक्ती इतर द्राक्षांच्या वाणांच्या तुलनेमध्ये जास्त आहे. तसेच हार्वेस्टींग कालावधीही इतर द्राक्षांइतकाच आहे. या द्राक्षाचे क्षेत्र वाढू लागले आहे. संदीप शिंदे सध्या द्राक्षाचे वाण मोफत उपलब्ध करून देत आहेत.

06214, 06213

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं मोठं पाऊल! मुदत संपलेल्या अन्नपदार्थांच्या पुनर्विक्रीबाबत नवे नियम लागू

BJP PM Candidate Announcement for 2029 : २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा PM पदाचा चेहरा ठरला! बैठकीत अमित शाहांनी अचानक जाहीर केलं 'हे' नाव; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ!

China EV Crisis: चिनी इलेक्ट्रिक कारचा जगात डंका, पण मायदेशात ठणठणाट! चीनच्या ईव्ही उद्योगाचं गणित कसं बिघडलं?

IND vs NZ, 4th T20I: टीम इंडियाचं नेमकं काय चुकलं? कर्णधार श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगिलतं; फिलिप्सचंही केलं भरभरून कौतुक

Marathi News Live Updates : सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध

SCROLL FOR NEXT