PNE26W51548
सोलापूर : हत्तूर येथे पिंक रूमच्या लोकार्पणप्रसंगी अभिषेक तापडिया, गणेश सुत्रावे व एसआयएचे पदाधिकारी.
---
पूरग्रस्त विद्यार्थिनींसाठी पिंक रूम
सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पुढाकारातून सुविधा
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २१ : सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने हत्तूर (ता. दक्षिण सोलापूर) येथील पूरग्रस्त श्री सोमेश्वर हायस्कूलमधील विद्यार्थिनींसाठी उभारण्यात आलेल्या पिंक रूम व स्वच्छतागृहाचे लोकार्पण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून असोसिएशनचे सहसचिव अभिषेक तापडिया उपस्थित होते. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष गणेश सुत्रावे होते.
मागील वर्षी जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर असोसिएशनने उद्योजक सभासदांना मदतीचे आवाहन केले होते. सभासद उद्योजकांच्या मदतीतून अध्यक्ष डी. राम रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुविधा उभारण्यात आली.
शाळेच्या मागणीनुसार विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृह व पिंक रूमची उभारणी करण्यात आली. विद्यार्थिनींच्या आरोग्य, स्वच्छता व सुरक्षिततेच्या दृष्टीने ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सहसचिव शिवशंकर आंधळकर यांनी उद्योजकांचे आभार मानले.
यावेळी सदस्य कमलेश शहा, व्यवस्थापक शुद्धोधन गायकवाड, शाळा समितीचे सचिव शंभूराजे भरले उपस्थित होते. सूत्रसंचालन गुरू अचलेरे यांनी केले. मुख्याध्यापक स्वप्नील हसापुरे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.