पुणे

येमेनजवळ व्यापारी जहाजाचे अपहरण

CD

नवी दिल्ली, ता. २१ (पीटीआय) : एडनच्या आखातातून जाणाऱ्या एका जहाजावर समुद्री चाच्यांनी गुरुवारी हल्ला करत जहाजासह सर्व वीस खलाश्यांचे अपहरण केले आहे. वीसपैकी १६ जण भारतीय आहे. हे सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती जहाजबांधणी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज दिली. चार दिवसांपूर्वीच सोमालियाजवळील समुद्रातूनही एका जहाजाचे अपहरण झाले होते. त्यावर सहा भारतीय खलाशी होते. त्यामुळे या आठवड्यात एकूण २२ भारतीय खलाश्यांचे अपहरण झाले असल्याने सागरी सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.
इरिट्रियाचा ध्वज असलेले ‘एमटी सिबू १’ हे तेलवाहू जहाज २० ऑगस्टला एडनच्या आखातात येमेनच्या किनारपट्टीपासून ३० सागरी मैल अंतरावर असताना सशस्त्र चाच्यांनी त्यावर हल्ला करत ताबा मिळवला. या जहाजावर एकूण २० कर्मचारी असून त्यामध्ये १६ भारतीय, एक सीरियन, एक सुदानी आणि एक इराकी नागरिक आहे. एका खलाशाचे नागरिकत्व समजलेले नाही. एका संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या सहा सशस्त्र चाचे जहाजावर असून त्यांनी संपूर्ण जहाजावर नियंत्रण मिळवले आहे. याआधी १७ ऑगस्टला सोमालियाच्या पुंटलँड किनारपट्टीजवळ कॅमेरूनचा झेंडा असलेले ‘लुतुफ’ हे मालवाहू जहाज चाच्यांनी पळवून नेले. या जहाजावरील १० कर्मचाऱ्यांपैकी सहा जण भारतीय आहेत. दोन लहान बोटींमधून आलेल्या आठ सशस्त्र चाच्यांनी ‘एके-४७’ सारख्या शस्त्रांच्या जोरावर जहाजावर प्रवेश केला. या जहाजावर मोठा शस्त्रसाठा आहे.
जहाजबांधणी मंत्रालयाने संबंधित भरती संस्थांना या घटनेचा सविस्तर अहवाल आणि वेळोवेळी मिळणारी माहिती ‘ई-नाविक’ या ऑनलाइन प्रणालीद्वारे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या दोन्ही प्रकरणांत अद्याप कोणत्याही खलाशाला दुखापत झाल्याचे वृत्त नाही. भारतीय यंत्रणा खलाश्यांच्या सुटकेसाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी आंतरराष्ट्रीय सागरी संस्थांच्या संपर्कात आहेत. या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi High Voltage Drama : राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; बळाचा वापर केल्याने दिल्लीत तणावाचे वातावरण

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

Redevelopment Project : पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये; ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’च्या अहवालातील माहिती

PM Suryaghar : महिन्याला ५-६ हजारांचे वीजबिल? सोलर पॅनेल बसवा; मिळवा ७८ हजारांची सबसिडी, रांचीमध्ये विशेष शिबिरे

SCROLL FOR NEXT