पिरंगुट, ता. १ : ‘‘नांदे- म्हाळुंगे रस्त्यावर अपघात होऊन बालकाच्या मृत्यूच्या घटनेसंदर्भात पत्रकारांशी मी जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला आहे. माझ्या विधानाचे राजकारण कुणीच करू नये. माझी संवेदनशीलता लोकांना, जनतेला माहीत आहे. प्रत्येक संकटात मदतीसाठी मी पुढेच असतो. त्या कुटुंबाला जेवढे सहकार्य करता येईल, तेवढे सहकार्य मी करणार आहे,’’ अशी माहिती आमदार शंकर मांडेकर यांनी दिली.
मांडेकर म्हणाले, ‘‘हिंजवडी, म्हाळुंगे, तसेच माण या भागातील पिण्याचे पाणी, रस्ते, वाहतूक कोंडी आदी समस्यांसाठी मी विधानसभेत सातत्याने पाठपुरावा करतोय. मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पत्रव्यवहार केलेले आहेत. या भागातील रस्त्यांची पूर्वीची रुंदी जेवढी आहे, तीच आज वापरात आहे. त्यामुळे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. भूसंपादनाचा प्रश्न मिटल्यावर रुंदीकरणाचाही प्रश्न मिटणार असून, वाहतुकीचाही प्रश्न सुटणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन हा प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडणार आहे. येथील रस्ता चांगला मजबूत आणि कायमस्वरूपी टिकाऊ होण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेचा विभाग, पोलिस विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न कायमचा मार्गी लावणार आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.