पिरंगुट, ता. १६ : रिहे-आंधळे रस्त्यावरील जवळ (ता. मुळशी) गावच्या हद्दीत भरधाव मोटारीने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. अंकुश दत्तात्रेय भालेराव (वय ५९, रा. कुळे, ता. मुळशी) असे मृताचे नाव असून, याप्रकरणी पौड पोलिसांनी अज्ञात मोटारचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. १२) सकाळी ११ च्या सुमारास अंकुश भालेराव, सुरज वारंगे आणि सुलोचना पवार हे तिघे दुचाकीवरून (एमएच १२ युवाय ७६३२) जवळ गावाकडे जात होते. बस थांब्याजवळ समोरून येणाऱ्या मोटारीने (एमएच १२ टीडी ०४३६) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात भालेराव यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुरज वारंगे आणि सुलोचना पवार जखमी झाले आहेत.
अपघातानंतर मोटारचालकाने जखमींना मदत करण्यास नकार दिल्याने आणि त्यांना पाऊण तास उपचाराविना ताटकळत ठेवल्याने भालेराव यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच, या घटनेबाबत पौड पोलिसांनी सुरुवातीला प्रतिसाद दिला नाही आणि शनिवारी (ता. १५) उशिराने गुन्हा दाखल केल्याचा दावाही मृताच्या मुलाने, किरण भालेराव यांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.