पुणे

अपघात टाळण्यासाठी उपाययोजनांची गरज

CD

पिरंगुट , ता. ५ : पुणे-कोलाड महामार्गावरील पिरंगुट (ता. मुळशी) येथील घाट रस्त्यावरील होणारे अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी राज्य रस्ते महामंडळ, पीएमआरडीए, पोलिस प्रशासन, ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग आदी विभागांची एकत्रित बैठक घेऊन त्यावर सातत्याने समन्वय साधून ठोस पर्याय काढणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
येथील अपघात टाळण्यासाठी ज्या काही विविध उपाययोजना केल्या गेल्या त्यात राज्य रस्ते महामंडळाने एका संस्थेची मदत घेऊन येथील घाट रस्त्याची पाहणी केली होती. त्या संस्थेच्या प्रतिनिधींनी सुचविल्याप्रमाणे येथील घाट रस्त्यात सूचना फलक, रंबलर, पांढरे पट्टे, रिफ्लेक्टर, झेब्रा कॅासिंग, लाल दिव्यांचे सिग्नल, धोकादायक वळणे कमी करणे, रस्त्यावर सांडलेला मिक्सरमधील सिमेंटचा राडारोडा काढणे आदी उपाययोजना केलेल्या आहेत, असे असूनही इथले अपघात थांबलेले नाहीत त्यामुळे यावर कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज आहे.

उपाययोजना पुढीलप्रमाणे
-घाट सुरू होण्यापूर्वी वाहनांची तपासणी करावी.
-मालाचे वजन, वाहनाची ब्रेक व अन्य यंत्रणा आदींची तपासणी
-अवजड वाहनांची वाहतूक मुकाईवाडीमार्गे वळविणे
-भक्कम स्वरूपाचे संरक्षक कठडे बांधणे.
-रस्ता रुंदीकरण
-गुल्हाणे इस्टेट ते पोलिस चौकीपर्यंत उड्डाण पूल उभारणे.
-अतिक्रमणे काढणे व साईडपट्टी निर्माण करणे
-अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करणे.

जिथे पिरंगुट घाट उतार सुरू होतो त्या भुकूम हद्दीतच जड व अवजड वाहने थांबवावीत व चालकांची तपासणी करावी. त्यानंतर वनालिका येथे वाहनांची ब्रेक तसेच अन्य यंत्रणेची तपासणी करावी.
-चांगदेव पवळे, माजी सरपंच, पिरंगुट

पुण्यातील नवले पूल परिसरामध्ये केलेल्या कॅमेरा चलन पद्धतीने दंड आकारण्यास सुरुवात करावी. याशिवाय घाटात विविध ठिकाणी सौरदिवे बसवावेत.
-रमेश पवळे, माजी सरपंच

हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने या रस्त्यावर ठराविक रुंदीकरणाशिवाय दुभाजक बसविता येत नाहीत. काही दिवसांपूर्वी आपण एका संस्थेच्या मार्गदर्शनाखाली या रस्त्यावर अपघात टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत.
-शैलजा पाटील, कार्यकारी अभियंता, राज्य रस्ते महामंडळ

येथील अपघात टाळण्यासाठी आम्ही पिरंगुट ग्रामपंचायतीला कळवून अतिक्रमण काढण्यासाठी कळविले आहे. सध्या आमच्याकडे वाहतूक नियमनासाठी दोनच वॅार्डन आहेत. औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कळवून अधिकच्या वॅार्डनची मागणी केलेली आहे. राज्य रस्ते महामंडळाकडे रस्ता रुंदीकरणाची मागणी केली आहे.
-राकेश गुमाने, सहाय्यक निरीक्षक, बावधन वाहतूक पोलिस विभाग

येथील रस्ता रुंदीकरणाशिवाय कोणताही पर्याय नाही. रुंदीकरणानंतर दुभाजक बसविले तर अपघाताला आळा बसेल. औद्योगिक संघटनेने किमान दहा स्वयंसेवक दिले तर गस्त वाढविता येईल.
-अरविंद पवार, वरिष्ठ निरीक्षक, बावधन पोलिस ठाणे

लवळे फाटा ते पोलिस चौकीपर्यंत उड्डाणपुलासारखा पर्याय केला तर काही अंशी अपघात थांबतील.
-ओजस पाटील, संचालक, श्रीपाद हॅाटेल

सध्या या रस्त्याला वेग नियंत्रणासाठी रंबलर बसविलेले आहेत. हे रंबलर काहीच कामाचे नाहीत त्याऐवजी मोठ्या आकाराचे गतिरोधक बसविणे गरजेचे आहे.
-श्रीधर जोशी, संचालक, जे. बी. केमिकल कंपनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gangapur News : अवैध दारू विक्री वाढल्याने वरखेड गावात महिला व ग्रामस्थांनी काढला गांधीगिरी मोर्चा; दारू विक्रीविरोधात ग्रामसभेत ठराव मंजूर

Nilanga News : मदतीसाठी कागदपत्रांचा ससेमिरा! गावाचा एकच पंचनामा करून सरसकट मदत द्या; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

Latest Marathi News Live Update : शिक्षक भरतीत लाखोंची फसवणूक, अपूर्व हिरेंसह पाच जणांवर गुन्हा

Pune News : उजनीतील खासगी मासेमारी ठेका प्रक्रिया रद्द; जलसंपदा विभागाच्या बैठकीत निर्णय

Baramati Crime : शेरेवाडी दुहेरी खूनाचा गुन्हा उघड....; नातलगानेच केला दुहेरी खून....

SCROLL FOR NEXT