पुणे

पिरंगुट घाटात पोलिसांनी चकाचक केला रस्ता

CD

कोळवण, ता. २८ : पिरंगुट घाटात आरएमसी गाडीतून सांडलेली माती आणि डस्ट (कच) बावधन पोलिस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांनी स्वतः साफ करून संभाव्य अपघात टाळले. सोमवारी (ता. २६) लवळे फाटा ते पिरंगुट घाट परिसरात ही घटना घडली.
पिरंगुट घाटातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर माती साचल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात येताच बावधन पोलिस ठाण्याच्या वाहतूक विभागातील पोलिस शिपाई मनोज गोसावी आणि पोलिस शिपाई पंडित धुळगंडे यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः हातात खराटा घेतला आणि रस्ता साफ करण्यास सुरुवात केली.
कर्तव्याची कोणतीही सीमा नसते आणि लोकांचे प्राण वाचवणे हेच आपले ध्येय असते, हेच या दोन्ही शिपायांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले. त्यांच्या या संवेदनशीलतेचे आणि धाडसी कामाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


‘‘खडीवरून घसरून अपघात होऊन नये म्हणून रस्त्यावर पडलेली खडी काढण्यासाठी वाहतूक अमंलदारानी स्वतः हातात झाडू घेतले व खडी बाजूला करून पाणी टाकून रस्ता स्वच्छ केला.’’
-राकेश गुमाने, सहायक पोलिस निरीक्षक, बावधन वाहतूक विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : पदवीधरांचा कौल सरकारविरोधात; धोरणांबद्दल तरुणांची नाराजी, दुष्काळी मदतीची पाच हजारांची रक्कम अपुरी

मोठी बातमी! INDIA आघाडीच्या महारॅलीला अभिजीत दीपके यांचा पाठिंबा; ‘GYANU MUST GO’ म्हणत पोस्ट, नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray: ''महाराष्ट्रात आणखी २३ प्रकल्प येत आहेत.. भीमाशंकर परिसरातील वृक्षतोड टेंडरशिवाय'', राज ठाकरेंची कर्जतमध्ये सभा

MLA Harshada Deshmukh : एमपीएससीतील पारदर्शकतेसाठी प्रयत्न करणार; रोजगार, शिक्षणाच्या प्रश्नांवरही देणार भर

Raj Thackeray Karjat tree cutting visit : "गुजरातमधल्या एका कंपनीसाठी हा सारा खटाटोप!"; कर्जतच्या जंगलात स्वतः उतरताच राज ठाकरेंचा सरकारवर थेट वार, सभेत तोफ धडाडणार!

SCROLL FOR NEXT