पुणे

पिरंगुटमधील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

CD

पिरंगुट, ता. ५ : पुणे- कोलाड रस्त्यावरील पिरंगुट आणि घोटावडे फाटा (ता. मुळशी) येथील वाहतूक कोंडी पर्यटक व वाहनचालकासाठी डोकेदुखी ठरत आहे.
रहदारीच्या दृष्टीने अत्यंत वर्दळीच्या असलेल्या या दोन ठिकाणी रविवारी (ता. ४) दुपारपासूनच वाहतूक कोंडीने कहर केला होता. याबाबत काही स्थानिकांनी पोलिस निरीक्षक दत्ता चासकर यांना संपर्क साधला. त्यानंतर पोलिस कर्मचारी व पोलिस मित्रांच्या सहकार्याने वाहतूक सुरळीत केली. काही स्थानिक नागरिकांनीही त्यासाठी मदत केली. त्यामुळे वाहतूक नियंत्रित करण्यास सुरवात केल्याने प्रवाशांची कोंडीपासून काही काळ सुटका झाली. मात्र, दिवसभर ही कोंडी वाहनचालकांना हैराण करीत होती.
रविवारचा दिवस असल्याने पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. त्यामुळे सायंकाळी साडेपाच वाजल्यानंतर येथील वाहतूक कोंडीला सुरवात झाली होती. त्यामुळे निरीक्षक दत्ता चासकर यांनी तातडीने कर्मचाऱ्यांना आदेश देऊन वाहतूक सुरळीत करून घेतली. पिरंगुट येथील एसटी थांबा व घोटावडे फाटा येथील चौकात पौड, कोळवण, घोटावडे, तसेच खारावडे आदी पीएमपीएलच्या बसचा थांबा आहे. प्रवाशांना घेण्यासाठी भर चौकातच बस थांबल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो.
तालुक्यातील ताम्हिणी, मुळशी धरण, लवासा, तसेच अन्य गड किल्ले व पर्यटन स्थळे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पिरंगुट, उरवडे, कासारआंबोली, भरे, अंबडवेट आदी परिसरातील वाढलेले औद्योगीकरण व नागरिकीरणामुळे येथील पुणे- कोलाड रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांच्या संख्येतही गेल्यावर्षीच्या तुलनेने चारपट वाढ झालेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhurandhar 2 ने पहिल्याच दिवशी कमावला 'इतक्या' कोटींचा गल्ला, बॉलिवूडच्या ओपनर सिनेमांचे सगळे रेकॉर्ड मोडले

Alphonso Mango Price : हापूसचा 'रुबाब' वाढला! 5 हजारांपासून 12 हजारांपर्यंत एक पेटी; सोन्याच्या दरात विकला जातोय कोकणचा राजा

Accident News : देवदर्शन ठरले अखेरचे ! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांंचा दुर्दैवी मृत्यू

Jalna News: परतूर तालुक्यात कामगार योजनेत मनमानी; वर्ष उलटले तरीही क्लेम रखडलेले

Marathi Language : इस्रायलमध्ये मराठीचा झेंडा! इवा तळेगावकरांनी परदेशात जपली मातृभाषेची ओळख

SCROLL FOR NEXT