पुणे

देवस्थानच्या इनाम जमिनी पुजाऱ्यांना देण्यास विरोध

CD

पिरंगुट, ता. १२ : राज्य शासनाने देवस्थान इनाम जमिनीसंदर्भात पुजारी व वहिवाटदारांच्या हिताच्या मसुद्याला मुळशीकरांनी तीव्र विरोध केला आहे. याबाबतचे लेखी निवेदन घोटावडे ग्रामस्थांनी मुळशीच्या तहसीलदारांना नुकतेच दिले आहे.
निवेदनानुसार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या देवस्थान इनाम जमिनी अस्तित्वात आहेत. देवाची पूजा-अर्चा आणि दिवाबत्ती करून देवाच्या नावे असलेली जमीन वहिवाटदार व पुजाऱ्यांनी कसून देवाचा उत्सव साजरा करावा, हा या जमिनी देण्यामागचा मूळ पवित्र उद्देश होता. मात्र काळानुरूप जमिनींना सोन्याचे भाव आल्याने या मूळ हेतूला हरताळ फासला जात असल्याचे चित्र दिसत आहे. काही हितसंबंधी लोक मागील दोन वर्षांपासून मुंबई मंत्रालयात फेऱ्या मारत असून, ‘आम्ही जमिनी सांभाळत आहोत, त्या आमच्या नावावर कराव्यात,’ अशी मागणी करत आहेत. हा सर्वस्वी स्वार्थी हेतू असून, देवस्थानच्या जमिनी हडपण्याचा हा प्रकार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याला गावागावातून भक्त आणि ग्रामस्थांकडून विरोध करीत आहोत. शासनाने या मसुद्यावर ५ जून २०२६ पर्यंत हरकती मागवल्या आहेत. शासनाने थेट निर्णय न घेता प्रत्येक गावात ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांचे आणि भक्तांचे म्हणणे जाणून घ्यावे. जर प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने या जमिनी पुजाऱ्यांच्या नावावर केल्या, तर मुळशी तालुक्यातील सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन मोठे जनआंदोलन उभारतील.
यावेळी संभाजी गोंडांबे, शरद गोडांबे व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेसेनेला पुन्हा मोठा धक्का! महिनाभरात अजून एका बड्या नेत्याचं पद रद्द; राजकीय समीकरणं बदलणार

बाईकस्वारावर झाडाची फांदी कोसळली, थेट कोमात; रस्त्यातच घडला भीषण प्रकार, पाहा VIDEO

Daryabhavani: स्वराज्याच्या इतिहास उलगडणार! शिवरायांच्या जलझुंजाची गाथा नववर्षी प्रदर्शित होणार; तारीख आली समोर

Latest Marathi News Live Update : बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंची युवासेना आक्रमक

आनंद शिंदेंच्या आवाजातील 'गोमु सासरला जाते' गाण्याचा धुमाकूळ; 'भुतम भयम'मधील गावरान ठसक्यातील गाणं ऐकलंत का?

SCROLL FOR NEXT