Pune City Road
Pune City Road Sakal
पुणे

पुण्यात सगळीकडे खड्डे अन मोदींच्या मार्गावरील रस्ते चकाचक

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - शहरातील रस्त्यांवर (Pune City Road) खड्डे (Pits) पडलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) रविवारी (ता. ६) पुणे दौऱ्यावर (Pune Tour) असल्याने ते ज्या मार्गाने शहरात जाणार आहेत तेथील रस्ते चकाचक (Clean) करण्याचे काम पुणे महापालिकेने (Pune Municipal) हाती घेतले आहे. रस्ते डांबरीकरण करणे, चौकांमध्ये झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारणे, पादचारी मार्ग, दुभाजकांना रंग देणे, झाडांना पाणी देणे, अतिक्रमण काढणे अशी कामे करण्याला गती आली आहे.

पुणे शहरातील मेट्रो मार्गाचे उद्घाटन करण्यासाठी नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्याचसोबत पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण, नदी सुधार प्रकल्प व नदी काठ सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन यासह इतर कार्यक्रमांना शुभारंभास मोदी उपस्थित राहणार आहेत. मोदी हे लोहगाव विमानतळावरून हेलिकॉप्टरने सिंचननगर येथील हेलिपॅडवर जाणार आहेत. तेथून सिंचन नगर येथून कारने पुणे महापालिकेत पुतळ्याच्या अनावरणासाठी जाणार आहेत. तेथून ते जंगलीमहाराज रस्त्याने गरवारे महाविद्यालय मेट्रो स्टेशनवर येणार आहेत. मेट्रोने मोदी आनंदनगर स्टेशन पर्यंत प्रवास करणार आहेत.

त्यानंतर तेथून एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर सभेसाठी जाणार आहेत. ही सभा संपल्यानंतर मोदी कारने पौड रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्ता, विद्यापीठ चौकातून वळून पुन्हा सिंचननगर येथील हेलिपॅडवर जाणार आहेत.

मोदी यांच्या या दौऱ्यात ते व त्यांचे ताफा गणेशखिंड रस्ता, काँग्रेस भवन रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, पौड रस्ता, एमआयटी महाविद्यालय रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्‍त्याने कारने जाणार आहेत. या मार्गावर उड्डाणपूल, पादचारी मार्ग, दुभाजक यासह इतर कामे सुरू आहेत. तसेच अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे. मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने हे सर्व रस्ते दुरुस्त व सुशोभीकरण केले जात आहेत. तसेच पादचाऱ्यांचे गतिरोधक वगळता इतर अशास्त्रीय गतिरोधक काढून टाकण्यात आले आहेत. यासाठी महापालिकेचे पथ विभाग व अन्य विभाग एकत्र काम करत आहेत, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: बारामतीच्या मतदानानंतर अजित पवार प्रचारातून गायब? शरद पवारांनी व्यक्त केली काळजी

Swati Maliwal News : दिल्लीच्या राजकारणात भूकंप! कुठे आहेत स्वाती मालीवाल? मारहाणीच्या मुद्द्यावरुन भाजपने 'आप'ला घेरलं

Latest Marathi News Live Update : मुंबई- अहमदाबाद मार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Rakhi Sawant Health Update: राखी सावंतला नेमकं काय झालंय? पूर्वाश्रमीच्या पतीनं दिली हेल्थ अपडेट

Astronomers: खगोलशास्त्रज्ञांनी 55 प्रकाशवर्षे दूर पृथ्वीच्या आकाराचा एक नवीन ग्रहाचा लावला शोध

SCROLL FOR NEXT