pits on Road
pits on Road Sakal
पुणे

वाहनचालक-पादचाऱ्यांनो सावधान... पुढे आहे खड्डेरूपी यमदूत

मोहिनी मोहिते

कॅन्टोन्मेंट - सेव्हल लव्ह चौकाकडून टिंबर मार्केटकडे जाणाऱ्या पं. जवाहरलाल नेहरू मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. या रस्त्याचे डांबरीकरण मागिल दिवसांपूर्वी केले आहे. मात्र, रस्त्याचे काम नित्कृष्ट दर्जाचे झाले असून, अडीच फूट आकाराचा आणि दीड फूट खोलीचा मोठा खड्डा पादचारी आणि वाहनचालकांना जीवघेणा ठरत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

जवाहर नेहरू रोड हा सेव्हन लव्हज कडून टिंबर मार्केट कडे जाणारा मार्ग आहे. याठिकाणी रहदारी मोठ्या प्रमाणात असते. भरधाव वेगाने वाहने याठिकाणी वाहतूक करतात. तसेच परिसरात टिंबर मार्केट मधील असणारी जड व छोटी मोठी वाहनांची रेलचेल कायम असते. अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येऊन ही याकडे दुर्लक्ष केले जात असून मोठ्या अपघाताची घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा सवाल ही सामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे.

एका महिन्यापूर्वी ठेकेदाराने या रस्त्यावर काम करत असताना पाईप लाईन टाकली तसेच खड्डे बुजवताना व्यवस्थित भर न टाकता वरच्या वर काम करून हे काम अर्धवट सोडून दिले आहे. या रस्त्याच्या मधोमध ड्रेनेज होते ते काढल्याने हा खड्डा पडला आहे. त्यामुळे वळण घेताना तसेच वाहतूक करताना या ठिकाणी दररोज छोटे मोठे अपघात होत असतात.

- कैलास शिंदे, टेम्पो चालक.

कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील शिवसेना विभागप्रमुख अनिल दामजी म्हणाले की, पंडित जवाहरलाल नेहरू रोड येथे दहा दिवसापूर्वी या रस्त्याचे काम केले. पालिका अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या रस्त्याचे काम नित्कृष्ट दर्जाचे झाले असल्याने अवघ्या दहा दिवसांत या रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला आहे. या कामातील दोषी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. अन्यथा शिवसेनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल. याबाबत मनपा मुख्य खाते व भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, अद्याप या खड्ड्याची दुरुस्ती केली नसल्याचे त्यांनी सांगितले.

यासंदर्भात मनपाचे अभियंता राजेंद्र अर्धापुरे म्हणाले की या रस्त्यावर चे काम पाणी पुरवठा विभागाने केले आहे. डांबरीकरण पथ्य विभागामार्फत झाले आहेत. पावसाळ्या ने हे रस्ते खचले आहे. संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून रस्ता दुरुस्त केला जाईल. अनिरुद्ध पावसकर, पाणी पुरवठा विभाग प्रमुख यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT