Bhor Rajwada sakal
पुणे

Bhor Rajwada and Neckless Point : पुणे परिसर दर्शन : भोरचा राजवाडा अन् नेकलेस पॉइंट

पुण्यापासून ५० किलोमीटर अंतरावर असलेले भोर हे तालुक्याचे शहर. कधीकाळी पंतसचिव यांच्या भोर संस्थानची राजधानी होते.

सकाळ वृत्तसेवा

पुण्यापासून ५० किलोमीटर अंतरावर असलेले भोर हे तालुक्याचे शहर. कधीकाळी पंतसचिव यांच्या भोर संस्थानची राजधानी होते. २४०० चौरस किलोमीटर एवढे पसरलेले हे संस्थान शंकराजी नारायण गंडेकर यांच्या राजाराम महाराजांनी केलेल्या पंतसचिव या नियुक्तीनंतर चालू झाले. या आधी ही नियुक्ती वेगवेगळ्या घराण्यातल्या लोकांची होत असे. पण, शंकराजी नारायण यांच्यापासून ती त्यांच्या घराण्यात कायम आली.

१६९७ मध्ये पंतसचिव झालेले शंकराजी नारायण आधी मोरोपंत पिंगळे या पेशव्यांकडे कामाला होते. नंतर राजाराम महाराज जिंजीला गेले, तेव्हा हुकूमतपन्हा रामचंद्रपंत अमात्य यांच्यासाठी सैनिकी पराक्रम गाजवून राज्य एकत्र ठेवण्यास त्यांनी मदत केली. राजाराम महाराज जेव्हा स्वराज्यात परत आले, तेव्हा या पराक्रमाची जाण ठेऊन त्यांनी भोरची जहागिरी देऊन त्यांना स्वराज्याचे सचिव म्हणजे आताच्या भाषेत सेक्रेटरी केले.

कालांतराने इंग्रजांच्या काळात हे भोर संस्थान झाले. पंतसचिव त्याचे राजे झाले. या संस्थानाला इंग्रज दरबारी नऊ तोफांचा मान होता. अकरा जणांनी राजेपद भूषविल्यावर पुढे हे पिढीजात राजेपद स्वातंत्र्यानंतर संपुष्टात आले. १६७९ मध्ये शंकराजी यांनी नेरे येथे लाकडी वाडा बांधला, पण नंतर काही वर्षांनी नवरात्रोत्सवात त्याला आग लागली. त्यामुळे चिमणाजी तृतीय यांनी १८६९ मध्ये भोर येथे एक भव्य राजवाडा बांधला.

पुरातन भारतीय आणि युरोपियन बांधकाम पद्धतींचा मिलाप साधून हा वाडा बांधला. याच्या बांधकामास त्यावेळी दोन लाख रुपये खर्च आला. भव्य तीन चौकी वाडा, ज्यात त्यांचा दरबारसुद्धा भरत असे, तसेच सर्व राजपरिवाराच्या मुक्कामाची सोय होती. आजही हा वाडा उत्तमरीत्या जोपासला आहे, त्यामुळे अनेक मराठी, हिंदी चित्रपटांचे शूटिंग येथे होत असते.

सातारा रस्त्याने भोर फाटा येथून भोरकडे जाताना लक्षवेधी ठरतो, तो नेकलेस पॉइंट. एका छोट्या टेकडीवरून रस्ता वळण घेत खाली उतरतो. तेथूनच येळवंडी नदीचे पात्र इंग्रजी c आकाराचे वळण घेते. उंचावरून हे वळण फार सुंदर दिसते. जवळच शूरवीर कोयाजी बांदल यांची समाधीसुद्धा आहे. सातारा रस्त्याने जाताना वाटेत नसरापूर फाटा लागतो, येथून जवळच बनेश्वर हे पेशवेकालीन शिव मंदिर आहे. येथील आसपासचा परिसर निसर्गरम्य असल्याने हे मंदिर पुणेकरांसाठी उत्तम सहलीचे ठिकाण आहे.

काय पहाल?

भोरचा राजवाडा, त्यातील मिश्र शैलीचे बांधकाम, नेकलेस पॉइंट, शूरवीर कोयाजी बांदल यांची समाधी, बनेश्वर मंदिर परिसर.

कसे पोहचाल

भोरला स्वारगेटहून दर तासाला बस आहे. नसरापूर बसने बनेश्र्वरला जाता येते.

- सतीश मराठे, इतिहासप्रेमी-गिर्यारोहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smriti Irani: स्मृती इराणींनी पॉलिटिकल कमबॅकची दिली हिंट...; जाणून घ्या, नेमकं काय म्हटलंय?

ENG vs IND, 4th Test: जैस्वाल-सुदर्शनची अर्धशतकं, पण रिषभ पंतच्या 'रिटायर्ड हर्ट'ने वाढवली चिंता; जाणून कसा होता पहिला दिवस

U19 ENG vs IND: वैभव सूर्यवंशी शून्यावर आऊट, पण कर्णधार आयुष म्हात्रेचं वादळी शतक; ड्रॉ कसोटीसह दौरा संपला

Revanth Reddy : रेवंत रेड्डींनी उपराष्ट्रपती पदाबाबत सूचवलं ‘हे’ मोठं नाव, अन् म्हणाले...

Rishabh Pant Injury: टीम इंडियाला धक्का! रिषभ पंतला बॉल लागला, पायातून रक्त आलं, गाडीत बसून सोडावं लागलं मैदान; Video

SCROLL FOR NEXT