Chaturshringi Temple sakal
पुणे

Chaturshringi Temple : पुणे परिसर दर्शन : एकेकाळची नवरात्रोत्सवातील मौज म्हणजे चतुःशृंगी मंदिर

साधारणतः वीस ते तीस वर्षांपूर्वी नवरात्रोत्सवात आबालवृद्धांची मौजमजा करण्याची आवडती जागा म्हणजे चतुःशृंगीची जत्रा.

सकाळ वृत्तसेवा

साधारणतः वीस ते तीस वर्षांपूर्वी नवरात्रोत्सवात आबालवृद्धांची मौजमजा करण्याची आवडती जागा म्हणजे चतुःशृंगीची जत्रा. पेशवाईत माधवरावांच्या कारकिर्दीत दुल्लभशेट नावाचे सावकार होते, त्यांचे दरबारात मोठे वजन होते.

वेळोवेळी ते पेशव्यांना कर्जही देत. पेशव्यांच्या टाकसाळीचा मक्तादेखील त्यांच्याकडेच होता. दुल्लभशेट यांनी आपल्या नोकरांमार्फत गणेश खिंडीजवळ डोंगरात एक देवीची मूर्ती शोधून काढली. तिचे छोटेसे मंदिर बांधले, त्याची पूजा करण्यासाठी पुजारी नेमले. १७८६ची ही घटना, तेव्हापासून हळूहळू पुणेकर येथे गर्दी करू लागले. यालाच चतुःशृंगी मंदिर असे नाव मिळाले. दुल्लभशेट हे टाकसाळीचे चालक होते. त्यांनी काही काळ ‘चतुःशृंगी रुपया’ चलनात आणल्याची नोंद आहे.

डोंगर भाग, आसपास जंगल, शीतल हवेमुळे हा परिसर पुणेकरांना एकदम आवडला, तसाच तो इंग्रजांनासुद्धा आवडला. त्यांनी १८६४ मध्ये गणेशखिंड पुढील मोकळ्या जागेत गव्हर्नर साहेबांसाठी शाही निवासस्थान बांधण्यास सुरुवात केली. १८६४ ते १८७१ या काळात इटालियन गॉथिक शैलीत; पण इथल्याच काळ्या पाषाणात हा बंगला बांधून पूर्ण झाला. टूबशॉ या आर्किटेक्टने केलेल्या डिझाईनप्रमाणे सी. ई. हॉवर्ड अभियंत्याने ही इमारत बांधली.

१९४७ नंतर इंग्रज गेले अन् हा बंगला म्हणजे पुणे विद्यापीठ झाले. इतर मोकळ्या जागेवर विद्यापीठाच्या इतर इमारती उभ्या राहिल्या. १९८८ मध्ये आयुका (IUCAA) येथे स्थापन झाले. सध्या दर शनिवारी पूर्व परवानगीने ५० ते ६० जण या केंद्राला भेट देऊन माहिती घेऊ शकतात (भेटीसाठी scipop@gmail.com या ईमेलवर परवानगी घेऊ शकता). तसेच दर शुक्रवारी सायंकाळी येथे आकाशदर्शन कार्यक्रमसुद्धा असतो.

काय पहाल?

चतुःशृंगी मंदिर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, मुख्य इमारत, आयुका.

कसे पोहचाल

चतुःशृंगी मंदिर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रसिद्ध आहे.

- सतीश मराठे, इतिहासप्रेमी-गिर्यारोहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic: गोकुळाष्टमी आणि दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबईत वाहतूक बदल; 'या' भागात प्रवेश बंदी, वाचा सविस्तर...

Viral Video: कुलूप उघडण्याची अनोखी पद्धत! चोराचा लाईव्ह डेमो पाहून पोलीसही अवाक्... पाहा व्हिडिओ

Pawandeep Rajan : अपघाताच्या 3 महिन्यानंतर 'इंडियन आयडल 12' चा विजेता पवनदीप कसा आहे? म्हणाला माझा जीव....

निशांची मधील पहिले गाणे 'डिअर कंट्री' प्रदर्शित! तबल्याच्या ठेक्यांसह हार्मोनियमच्या सूरांनी केले मनात घर

Malegaon Crime : मालेगाव पोलिसांची मोठी कारवाई; ३० दुचाकी चोरणाऱ्या ५ जणांना अटक

SCROLL FOR NEXT