Empress Botanical Garden sakal
पुणे

Empress Botanical Garden : पुणे परिसर दर्शन : एम्प्रेस गार्डन उत्कृष्ट निसर्ग पर्यटन

आज जागतिक वसुंधरा दिन आहे. माणसाने आपल्या आरामासाठी, भौतिक सुखासाठी आणि बेसुमार लोकसंख्येमुळे वसुंधरेवर म्हणजेच पृथ्वीवर कळत नकळत खूप अत्याचार केले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

आज जागतिक वसुंधरा दिन आहे. माणसाने आपल्या आरामासाठी, भौतिक सुखासाठी आणि बेसुमार लोकसंख्येमुळे वसुंधरेवर म्हणजेच पृथ्वीवर कळत नकळत खूप अत्याचार केले आहेत.

आज जागतिक वसुंधरा दिन आहे. माणसाने आपल्या आरामासाठी, भौतिक सुखासाठी आणि बेसुमार लोकसंख्येमुळे वसुंधरेवर म्हणजेच पृथ्वीवर कळत नकळत खूप अत्याचार केले आहेत. त्या नुकसानीची परतफेड होईल अशा बऱ्याच कमी जागा आहेत. त्यातील एक म्हणजे एम्प्रेस गार्डन.

पेशवाईमध्ये सरदार पुरंदरे यांची बरीच मोठी जागा हडपसरजवळ होती. दाट जंगलांनी अच्छादित असलेली ही जागा इंग्रजांनी त्यांच्याकडून सन १८३८ मध्ये विकत घेतली. तेथील जंगलाचा वापर करून स्थानिक व इतर वनस्पतींची लागवड करून एक मोठी बाग तयार केली. सर जॉन माल्कम या मुंबई इलाकाच्या गव्हर्नराने ‘ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टन इंडिया’ ही संस्था सन १८३० मध्ये चालू केली. त्यात काही वनस्पतीशास्त्रज्ञ सभासद करून घेतले.

या सोसायटीने सन १८९२ मध्ये या बागेचे व्यवस्थापन चालू केले. राणी व्हिक्टोरियाच्या भारत भेटीवेळी या बागेचे नाव ‘एम्प्रेस गार्डन’ असे ठेवले. ही ३९ एकर जमिनीवर पसरलेली बाग स्वातंत्र्यानंतरसुद्धा याच संस्थेतर्फे बघितली जात होती. या जागेत मुलांना खेळण्यासाठी बाग, नाना-नानी पार्क, त्याबरोबरच पाच एकरावर पसरलेली नर्सरी आहे. शेकडो वर्षांपासून वाढलेले मोठमोठे वृक्ष येथे आहेत. मुख्यतः स्थानिक वृक्ष आणि वनस्पती वाढविण्यावर या ठिकाणी भर दिला जातो. याशिवाय फर्न हाऊस, ऑरगॅनिक फार्मिंग, माहिती फलक, बसण्यासाठी काही ठिकाणी सोय अशा अनेक सुधारणा येथे केल्या आहेत. येथे येणाऱ्यांसाठी अनुभवी सल्ला, संशोधन केंद्र अशा गोष्टींवर काम चालू आहे.

लोकांमध्ये निसर्गाची आवड निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी येथे फुले, झाडे, भाज्यांचे प्रदर्शन भरविले जाते. यामध्ये सुमारे ३० ते ४० हजार लोक सहभागी होतात. ‘फ्रेंड्स ऑफ एम्प्रेस गार्डन’ असा एक गट दर महिन्याला येथे भेट देतो. त्यात हवामान आणि निसर्ग संशोधन संवर्धन या विषयावर चर्चा होते.

काय पहाल

दाट निसर्गाने नटलेली जागा, झाडांच्या वेगवेगळ्या प्रजाती, सुसज्ज नर्सरी.

वेळ : सकाळी ९ ते सायं. ५.३०

प्रवेश शुल्क : २० रुपये.

कसे पोहचाल

हडपसर रस्त्याला रेस कोर्स किंवा एम्प्रेस गार्डन आहे. तेथे पीएमपी बसने किंवा स्वतःच्या वाहनाने जाता येते.

- सतीश मराठे, इतिहासप्रेमी- गिर्यारोहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: उकाड्यानंतर गारवा! सांगली जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार, गारांचाही मारा

रिटायरमेंट फंडवर सरकारचा मोठा डाव! पेन्शन क्षेत्रात FDI वाढणार, मान्सून अधिवेशनात कायदा बदलणार?

Pune Crime: पुण्यात विद्यार्थ्याचा जीव गेला; यशोतेज ॲकॅडमीच्या संचालकांसह तिघांवर गुन्हा, काय घडलं अन् उचललं टाेकाच पाऊलं!

Tamil Nadu Fireworks Factory Blast : तामिळनाडूत मोठी दुर्घटना; फटाका कारखान्यात भीषण स्फोट, १६ ठार, ६ गंभीर जखमी

Maharashtra Police Selection: प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेतकरी कुटुंबातील रोहन तळपेची महाराष्ट्र पोलिस दलात निवड

SCROLL FOR NEXT