Pune Lal Mahal Sakal
पुणे

Pune Lal Mahal : पुणे परिसर दर्शन : शिवरायांचे बालपण अनुभवलेला लाल महाल

पुण्याला स्वतःची ओळख आणि महत्त्व मिळाले ते आधी शिवरायांमुळे आणि पुढे पेशव्यांमुळे.

सकाळ वृत्तसेवा

पुण्याला स्वतःची ओळख आणि महत्त्व मिळाले ते आधी शिवरायांमुळे आणि पुढे पेशव्यांमुळे. पुण्याला स्वतःची ओळख आणि महत्त्व मिळाले ते आधी शिवरायांमुळे आणि पुढे पेशव्यांमुळे. त्याआधी पुण्याचा उल्लेख इसवी सन ७५८ मध्ये राष्ट्रकूट राजवटीतील एका ताम्रपटात आढळतो; पण त्या वेळी इतर छोट्या गावांप्रमाणेच पुणे हे गाव होते.

पुढे निजामशहा आणि आदिलशहा यांच्या संघर्षात शहाजीराजे निजामाच्या बाजूने असल्यामुळे आदिलशहाच्या मुरार जगदेव या सरदाराने १६३१ मध्ये स्वारी करून पुण्याचा पूर्ण विध्वंस केला. शहाजी राजे आदिलशाहीत गेल्यावर पुण्याच्या जहागिरीच्या ठिकाणी जिजाऊसाहेब आणि धाकटे पुत्र म्हणजेच आपले शिवाजी महाराज मुक्कामास आले. त्यांनी विश्वासू लोकांच्या मदतीने पुण्यापासून परागंदा झालेल्या लोकांना परत आणून वसवले.

कसबा गणपती या ग्रामदैवताच्या जवळच झांबरे पाटलांकडून जागा विकत घेऊन तिथे भव्य वाड्याचे बांधकाम केले. जेधे शकावलीमध्ये या वाड्याचा उल्लेख ‘लाल महाल’ असाच आहे. या भव्य वाड्यात जिजाऊसाहेब, शिवराय आणि त्यांचे थोरले बंधू संभाजीराजांसाठी एक-एक महाल बांधला होता त्याबरोबरच गोठा, पागा आणि फौजेची व्यवस्था होती.

याच वाड्यात शिवरायांचे बालपण गेले. पण ते येथे जास्त काळ राहिले नसावेत, कारण स्वराज्य स्थापनेनंतर ‘राजगड’ येथे राजधानी स्थापन करून ते तिथेच वास्तव्यास गेले. नंतर १६६० मध्ये शाहिस्तेखान स्वारीच्या वेळी या महालात वास्तव्यास होता. त्या वेळी महाराजांनी त्याच्यावर घातलेला छापा आणि त्याची तोडलेली बोटे सगळ्यांना माहीतच आहेत.

पेशवाईच्या वेळी इथे फक्त अंबारखाना म्हणजे धान्याचे कोठार शिल्लक होते. पुढे इंग्रजांच्या वेळी तिथे जिजामाता उद्यान तयार केले. नंतर पुणे महापालिकेने महाराजांची आठवण म्हणून सध्याची लाल महालाची इमारत बांधली. आता त्यासमोरून जाताना शिवरायांच्या आठवणीने आदरयुक्त भावनेने मान खाली झुकते.

काय पहाल

आताच्या लाल महालाचे बांधकाम पुणे महापालिकेने केले आहे, जरी जुने बांधकाम शिल्लक नसले तरी आताचा लाल महालसुद्धा बघण्यासारखा आहे, तसेच जुन्या वास्तूची आठवण करून देणारा आहे. पलीकडेच छोटेखानी जिजामाता उद्यानही आहे.

कसे पोहचाल

पुण्यात कसबा पेठेत गेल्यावर लाल महाल प्रसिद्ध आहे.

भेट देण्याची वेळ - सकाळी ९ ते १, संध्याकाळी ४ ते ८.

सतीश मराठे, इतिहासप्रेमी-गिर्यारोहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : पानशेत धरण कालव्यात बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू; हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमची तत्काळ मदत

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT