Malhargad sakal
पुणे

Malhargad and Dhawalgad : पुणे परिसर दर्शन : मल्हारगड अन् ढवळगड

दिवेघाट चढून पुढे सासवडकडे थोडे अंतर गेल्यावर झेंडेवाडी फाटा लागतो, तेथून किंवा सासवडपासून ६ किमी अंतरावरील सोनोरी गावातून मल्हारगड ऊर्फ सोनोरी किल्ल्यावर जाता येते.

सकाळ वृत्तसेवा

दिवेघाट चढून पुढे सासवडकडे थोडे अंतर गेल्यावर झेंडेवाडी फाटा लागतो, तेथून किंवा सासवडपासून ६ किमी अंतरावरील सोनोरी गावातून मल्हारगड ऊर्फ सोनोरी किल्ल्यावर जाता येते. गडावर जायला साधारण अर्धा ते एक तास लागतो. पेशव्यांचे सरदार पानसे यांच्या घराण्यातील भीमराव यशवंतराव आणि कृष्णाजी माधवराव यांनी १७५७ ते १७६० मध्ये हा किल्ला बांधला. दिवेघाटाचे रक्षण करण्यासाठी हा किल्ला उपयोगात आणला.

सरदार पानसे म्हणजे पेशव्यांचे तोफखाना प्रमुख. १७७१-७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे या किल्ल्यावर येऊन गेल्याची नोंद आहे. किल्ल्यावर प्रवेशद्वार चांगल्या स्थितीत आहे. आत गेल्यावर काही वाड्याचे अवशेष, पाण्याची टाकी, विहीर, इतर वाटांनी येणारे दोन दरवाजे आणि दोन मंदिरे आहेत. राजा शिवछत्रपती परिवार ही संस्था गड संवर्धनाचे काम करते. गडाची तटबंदी चांगल्या स्थितीत आहे.

सोनोरी येथे सरदार पानसे यांचा सहा बुरूज असलेला वाडा आहे. याच डोंगर रांगेत पुढे गेल्यावर सासवडपासून वनपुरी-सिंगापूर-पारगाव चौफुला- वाघापूर-आंबळे मार्गाने ढवळगड या किल्ल्यावर जाता येते. गडाला उत्तरेकडून दुसरा मार्ग उरुळी कांचनमधून गडाच्या जवळ असणाऱ्या डाळिंब या गावातून आहे. हा मार्ग जरा खडतर आहे. या वाटेने रेल्वे मार्ग पार करून आल्यावर मेटाचे अवशेष (मेट म्हणजे गडाखालची अर्ध्यावरची चौकी) दिसून येतात.

आंबळेतून गडावर जाताना अजून एक मेट आहे. येथील चुन्याचा घाणा अजूनही शाबूत आहे. गडावर एका दगडात दोन हनुमानाचे शिल्प, दरवाजाजवळ गणपतीचे शिल्प, अर्धवट पडलेला दरवाजा, एका बाजूची तटबंदी, एक बुजलेले पाण्याचे टाके आणि ढवळेश्वर महादेवाचे मंदिर आहे. तटात तोफा, बंदुकीने मारा करण्याच्या जागा, कमानीचा दरवाजा, त्याच्या देवड्या, पाण्याची खोदीव टाकी, मेटाच्या जागा, त्यावरील चुन्याचा घाणा असे अवशेष हा किल्ला असल्याचे दर्शवितात.

किल्ला कधी बांधला? याचा निश्चित उल्लेख किंवा पुरावा मिळत नाही. तो शिवकाळात किंवा पेशवाईत बांधला असावा. या किल्ल्याचे शास्त्रशुद्ध सर्वेक्षण करून दुर्ग अभ्यासक डॉ. सचिन जोशी आणि ओंकार ओक यांनी नोंद असलेला ढवळगड किल्ला म्हणजे हाच हे सप्रमाण सिद्ध केले. पायथ्याच्या आंबळे गावात पेशवेकालीन पाच मंदिरे आहेत.

काय पहाल?

मल्हारगडावरील तट, दरवाजा, पाण्याची टाकी, दोन मंदिरे, ढवळगड येथील मेटे, चुन्याचा घाणा, तटबंदी, पाण्याची टाकी, ढवळेश्वराचे मंदिर, आंबळे गावातील पाच मंदिरे.

कसे पोहचाल

दोन्हीही किल्ल्यांना सासवड येथून बसने जाता येते.

(समाप्त)

- सतीश मराठे, इतिहासप्रेमी-गिर्यारोहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICICI Bank: बँकेची मोठी घोषणा... आता खात्यात 10,000 रुपयां ऐवजी किमान 50,000 रुपये ठेवावे लागतील

Mohammed Siraj: सिराज माझ्यावर प्रचंड रागावला होता...! अजिंक्य रहाणेकडून मोठी कबुली; नेमकं काय झालेलं?

सेटवर सगळ्यांसोबत कशी वागते तेजश्री प्रधान? मालिकेतील भावाने सांगितला अनुभव; म्हणाला- अशी गोड दिसते पण ती खूप...

Ladki Bahin Yojana : पुरुष 'लाडकी बहीण' कसे बनले? २६ लाख अपात्र असलेल्यांचे अर्ज मंजूर कसे झाले? वाचा नेमका कुठं घोळ झाला

Pension Dispute Assault : पेन्शनचे पैसे न दिल्याने पोरानं काठीने आईला केली मारहाण, पत्नी आडवण्यास गेली अन्

SCROLL FOR NEXT