Mhavashi Mandir sakal
पुणे

Mhavashi Mandir : पुणे परिसर दर्शन : म्हावशी मंदिर

पुणे-सातारा रस्त्यावर शिरवळच्या पुढे खंडाळा गाव आहे. तेथून लोणंद रस्त्याला पाच किलोमीटर अंतरावर म्हावशी नावाचे छोटे गाव आहे. या गावाजवळ एक वेगळेच मंदिर बघायला मिळते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे-सातारा रस्त्यावर शिरवळच्या पुढे खंडाळा गाव आहे. तेथून लोणंद रस्त्याला पाच किलोमीटर अंतरावर म्हावशी नावाचे छोटे गाव आहे. या गावाजवळ एक वेगळेच मंदिर बघायला मिळते.

पुणे-सातारा रस्त्यावर शिरवळच्या पुढे खंडाळा गाव आहे. तेथून लोणंद रस्त्याला पाच किलोमीटर अंतरावर म्हावशी नावाचे छोटे गाव आहे. या गावाजवळ एक वेगळेच मंदिर बघायला मिळते. जमिनीत खोदून तयार केल्याप्रमाणे हे अष्टभुजा हिंगळाई मातेचे मंदिर आहे. मातीच्या कच्च्या विटा वापरून हे मंदिर बांधले आहे. मंदिरामागे छोटेसे टेकाड आणि पुढे थोड्या अंतरावर एक ओढा आहे. साधारणतः दोन हजार वर्षांपूर्वी येथे छोटी वस्ती असेल, कारण पुरातन वस्ती असल्यास तेथे माती पांढरी होते, त्याला पांढरीचे टेकाड असे म्हणतात. अशी पांढरी माती येथे आहे.

मध्ययुगात कोणीतरी ही माती वापरून नुसत्या उन्हात वाळवलेल्या विटा तयार केल्या. त्यातून देव्हारा, मंडप आणि त्याच्या बाजूला दोन खोल्या असे छोटेसे मंदिर बांधले. कालांतराने पावसाबरोबर टेकडीवरील माती वाहून या मंदिराजवळ आणि काही ठिकाणी मंदिरावर जमा झाली. त्यामुळे आता मंदिर जमिनीत गाडल्यासारखे वाटते. पायऱ्या उतरून देवीच्या दर्शनाला जावे लागते. जवळच एक शाळा असून, सर्व परिसर मोठमोठ्या झाडांच्या सावलीत आहे. त्यामुळे येथे मनःशांती प्राप्त होते.

खंडाळ्याला येताना सारोळानंतर शिरवळ इंडस्ट्रिअल एरियात उजव्या बाजूला लयणगिरी डोंगर आहे. त्यात सात ते आठ लेणी आहेत. ही लेणी अर्धवट सोडली असून ती हिंदू की बौद्ध हे सांगता येत नाही, तिला लयणगिरी लेणी असे म्हणतात. तसेच पुढे पंढरपूर फाट्याजवळ दगडात बांधलेली छोटी वास्तू दिसते. ही वास्तू म्हणजे पेशवाईत बांधलेली एक पाणपोई आहे. तिचे बांधकाम १७५२ ते १७५३ या वर्षात झाले. नाना फडणवीस यांनी निळकंठ महादेव यांना लिहिलेले एक पत्र आहे. त्यात ‘नाथो सदाशिव याला खंबाटकीचे घाटात पोवई (पाणपोई) घालण्यास पाठवले आहे’ असे लिहिले असून किती आणि कोणते साहित्य दिले आहे याची यादी आहे. शिवरायांनी सर्वांत पहिली लढाई केली, तो शिरवळचा सुभानमंगळ किल्ला पाहता येईल. आता जुना किल्ला शिल्लक नसला, तरी तेथे छोटे बांधकाम करून त्याची आठवण ठेवलेली आहे.

काय पहाल

म्हावशीचे मातीचे मंदिर, मातीची अष्टभुजा देवी, लयणगिरी लेणी, पेशवेकालीन पाणपोई, शिरवळचा सुभानमंगळ किल्ला

कसे पोहचाल

पुण्याहून खंडाळ्याला बसने जाता येते. पुढे म्हावशीला जीपने जाता येते. खंडाळा आणि शिरवळ येथे जेवणाची व्यवस्था होईल.

- सतीश मराठे, इतिहासप्रेमी- गिर्यारोहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर काका पुतण्या सोबत! दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार, अजित पवार यांनीच केली घोषणा

Akola Municipal Election 2025 : संपर्क झाला, पण प्रतिसाद नाही; अकोल्यात काँग्रेस-वंचित समीकरण का अडलं?

सुरुंगाच्या स्‍फोटाने कातरखटाव हादरले; बाजार सुरू असतानाच धमाक्याने पळापळी, दोघे जखमी, घरांवर दगडी अन्..

Railway : पुणे-मनमाड लोहमार्ग होणार ‘भार’दस्त; नवीन रूळ तब्बल ५५ कोटी टन वजनाचा भार वाहणार

Murlidhar Mohol : पुण्यावर मोदी-फडणवीसांचे व्यक्तिगत लक्ष; पन्नास हजार कोटींच्या विकासकामांना गती

SCROLL FOR NEXT