Pandeshwar Temple sakal
पुणे

Pandeshwar Temple : पुणे परिसर दर्शन : पांडेश्वर मंदिर

जेजुरी-मोरगाव रस्त्यापासून आत पांडेश्वर या गावात कऱ्हा नदीजवळ पांडेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे.

सकाळ वृत्तसेवा

जेजुरी-मोरगाव रस्त्यापासून आत पांडेश्वर या गावात कऱ्हा नदीजवळ पांडेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे.

जेजुरी-मोरगाव रस्त्यापासून आत पांडेश्वर या गावात कऱ्हा नदीजवळ पांडेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे. गावापासून बाहेर, निवांत आणि सुंदर ठिकाणी असलेले हे मंदिर मनाला एक वेगळीच शांतता देते. पांडेश्वर नावाप्रमाणेच हे मंदिर पांडवांनी बांधले. पांडवांच्या हातून ब्रह्मदेवाचे कमंडलू कलंडले आणि त्यातून मंदिराशेजारी असलेल्या कऱ्हा नदीचा उगम झाला अशी कथा प्रचलित आहे. असे असले तरी मंदिरावर चालुक्य शैलीचा प्रभाव दिसून येतो.

या भागात असलेल्या बऱ्याच मंदिरांमध्ये मुख्य मंदिराबाहेर भव्य नंदीमंडपात कोरलेला नंदी विराजमान आहे. नंदीमंडपाच्या पलीकडे एक निमुळता स्तंभ असून, त्यावर जाण्यासाठी त्याच्या पोटातून छोट्या पायऱ्या बांधल्या आहेत. त्याच्यावर चुन्यातून बनवलेली काही शिल्पे आहेत. मंदिर पुरातन असले, तरी त्याची बऱ्याचदा दुरुस्ती केली असावी असे वाटते. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ दोन द्वारपाल आहेत. नंतरच्या काळात या मूर्ती तोडल्या असाव्यात.

मंदिरात चालुक्य शैलीचे खांब दिसतात. खांबांच्या शिरोभागी फणा काढलेले नाग कोरले आहेत. भिंतीवर अनेक कोनाडे आहेत. ज्यात पूर्वी मूर्ती असतील, त्यातील एखादीच मूर्ती शिल्लक आहे. मंदिराला तटबंदी असून, त्यात कमानीयुक्त ओसऱ्या आहेत. पूर्वी या ओसऱ्यांच्या भिंतींवर चित्रे काढलेली होती, त्यातील थोड्या पुसटशा खुणा दिसतात. ओसरीवर जाण्यासाठी दोन जिने आहेत, तसेच नंदीमंडपावर जाण्यासाठी अरुंद जिना आहे. वरून मंदिर, शेजारी नदी, त्यावर बांधलेले घाट असे दृश्य सुंदर दिसते.

पावसाळ्यात जेव्हा नदी वाहते, तेव्हा परिसर फारच सुंदर दिसतो. ओसरीच्या पलीकडे एक दगडी वृंदावन आणि एक समाधी आहे. मंदिराचा कळससुद्धा नंतर बांधला किंवा दुरुस्त केला असावा. मंदिराचे जुने गर्भगृह पडझडीमुळे नंतर बांधल्यासारखे आधुनिक आहे. मात्र, शिवपिंड मोठी आणि दगडावर प्रस्थापित आहे. परिसरात चार छोटी मंदिरे आहेत. ती कुंती, नकुल, सहदेव इत्यादींची आहेत असे म्हणतात. एका वेगळ्याच सुंदर आणि शांत ठिकाणी जायचे असल्यास पांडेश्वरला भेट द्यावी.

काय पहाल?

सुंदर परिसर, भव्य नंदीमंडप, त्यामागचा स्तंभ, दगडी मंदिर, चालुक्य शैलीचा सभामंडप, भव्य शिवपिंड, कमानीदार ओसऱ्या, त्यातील चुन्यात कोरलेल्या मूर्ती, वीरगळ.

कसे पोहचाल

सासवडपासून पांडेश्वर गावी बसने किंवा स्वतःच्या वाहनाने जाता येते.

- सतीश मराठे, इतिहासप्रेमी-गिर्यारोहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dattatreya Hosabale : 'भारताने पाकिस्तानशी संवादाची दारे पूर्णपणे बंद करू नयेत'; RSS सरचिटणीसांचं मोठं विधान, हिंदूराष्ट्राबाबतही केलं भाष्य

SSC HSC Supplementary Exam : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; राज्य मंडळातर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Latest Marathi News Live Update : CBI चं पथक नाशिकमध्ये दाखल; नीट प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारचा घेणार ताबा

पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनचे पडसाद! जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरून प्रवास; मोर्चा काढत केंद्र सरकारवर टीका

Sangli Wall Collapse : मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमाला गालबोट; वादळी वाऱ्यामुळे अंगावर चिरा-विटांची भिंत कोसळून 5 ते 6 भाविक ठार, 12 जण जखमी

SCROLL FOR NEXT