sarasbaug sakal
पुणे

Pune Sarasbaug : पुणे परिसर दर्शन : सारसबाग, तळ्यातला गणपती!

पर्वतीवर मंदिर बांधून झाल्यावर इ.स. १७५३ ते ५५ या काळात नानासाहेब पेशव्यांनी पर्वतीच्या पायथ्याला तळे खोदायची योजना आखली. त्यावेळी आंबिल ओढा आत्ताच्या सारसबागेतून, बाजीराव रस्त्याने नदीला येऊन मिळायचा.

सकाळ वृत्तसेवा

पर्वतीवर मंदिर बांधून झाल्यावर इ.स. १७५३ ते ५५ या काळात नानासाहेब पेशव्यांनी पर्वतीच्या पायथ्याला तळे खोदायची योजना आखली. त्यावेळी आंबिल ओढा आत्ताच्या सारसबागेतून, बाजीराव रस्त्याने नदीला येऊन मिळायचा.

पर्वतीवर मंदिर बांधून झाल्यावर इ.स. १७५३ ते ५५ या काळात नानासाहेब पेशव्यांनी पर्वतीच्या पायथ्याला तळे खोदायची योजना आखली. त्यावेळी आंबिल ओढा आत्ताच्या सारसबागेतून, बाजीराव रस्त्याने नदीला येऊन मिळायचा. पण पुण्याच्या वाढीची गरज लक्षात घेऊन नानासाहेबांनी आंबिल ओढा बांध घालून उलट दिशेने वळवला. भविष्यातील पाण्याची गरज ओळखून त्या बांधाला लागून २५ एकर जागेमध्ये खोल तळे खोदायला घेतले. यासाठी बेलदारांच्या दोनशे जोड्या कार्यरत होत्या. आताची सारसबाग आणि सणस ग्राउंड मिळून हे तळे होते.

खोदल्यावर बरेच नैसर्गिक झरे तळे भरू लागले. जरी भविष्याची आवश्यकता म्हणून हे तळे खोदले तरी त्यामुळे तिथला परिसर सुंदर दिसायला लागला. तळे खोदताना त्यात एक टेकाड तसेच ठेवले होते. तिथे विश्रांतीसाठी एक छोटे घर त्यांनी बांधून घेतले त्याला सारसबाग असे नाव दिले होते. पुढे त्यांचे नातू सवाई माधवराव पेशवे यांनी त्या ठिकाणी एका उजव्या सोंडेच्या गणपतीचं मंदिर बांधलं. हेच ते आजच सिद्धिविनायक मंदिर. तळे ते पर्वती यामध्ये दाट झाडी होती. तिथे प्राणी संग्रहालय तयार केले, ज्याला पूर्वी ‘शिकारखाना’ असे म्हणत. पुढे सवाई माधवरावांच्या कारभारात हा शिकारखाना पर्वती पायथ्यापर्यंत ४५ एकरमध्ये वाढवण्यात आला.

पुणे महापालिकेने १९६८ मध्ये या दुरवस्थेतील तळ्याचे दुरुस्ती आणि इतर काम करून त्या ठिकाणी आजची सारसबाग तयार केली. त्याचबरोबर पूर्वी जो पेशव्यांचा शिकारखाना होता त्याला पेशवे पार्क असे नाव देऊन तिथे प्राणी संग्रहालय चालू केलं. आता ते प्राणी संग्रहालय कात्रजला हलवल्यामुळे तिथे साहसी खेळ आणि एनर्जी पार्क अशी सोय आहे.

कसे जाल?

पर्वती भागात सारसबाग, गणेश मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. स्वारगेटवरून चालत जाता येते.

काय पहाल?

सारसबाग इथे छान हिरवळ आणि त्यामध्ये एका टेकडीवर सिद्धिविनायक मंदिर, पेशवे बागेत लहान मुलांसाठी साहसी खेळ आणि एनर्जी पार्क आहे. पेशवे बाग सकाळी १० ते १ आणि दुपारी २ ते ६ सुरू असते.

प्रवेश शुल्क ३० रुपये

- सतीश मराठे, इतिहासप्रेमी-गिर्यारोहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

SCROLL FOR NEXT