Tikona Fort sakal
पुणे

Tikona Fort : पुणे परिसर दर्शन : पवन मावळचा पहारेकरी किल्ले तिकोना

पवन मावळचा हा पहारेकरी त्याच्या माथ्याच्या त्रिकोणी आकारामुळे आपले लक्ष वेधून घेतो आणि त्यामुळेच कदाचित त्याला तिकोना असे नाव पडले.

सकाळ वृत्तसेवा

पवन मावळचा हा पहारेकरी त्याच्या माथ्याच्या त्रिकोणी आकारामुळे आपले लक्ष वेधून घेतो आणि त्यामुळेच कदाचित त्याला तिकोना असे नाव पडले.

पवन मावळचा हा पहारेकरी त्याच्या माथ्याच्या त्रिकोणी आकारामुळे आपले लक्ष वेधून घेतो आणि त्यामुळेच कदाचित त्याला तिकोना असे नाव पडले. किल्ल्यावर सातवाहनोत्तर काळातली गुहा आणि टाकी खोदलेली आहेत.

तिकोना हा सोप्या चढणीचा छोटेखानी किल्ला आहे, वर जायला दोन वाटा आहेत. पूर्वेकडून एक वाट आहे ती पायथ्याच्या दोन्हीही गावात उतरते, या वाटेवर जाताना एक दरवाजा आहे. त्यानंतर एक मोठी हनुमान मूर्ती आहे त्याला भिंतीतला हनुमान असे म्हणतात. त्याच्यापुढे एक खडकात खोदलेली गुहा आणि त्याच्यासमोर एक विहीर आहे. इथेच पेठ तिकोना गावातून उत्तरेकडची वाट येते. ही जरा कठीण असून या वाटेवर सुद्धा तटात एक छोटा दरवाजा आहे.

गूहेकडून बालेकिल्ल्याकडे जाताना एक भलामोठा दगडी चाक सदृश चुन्याचा घाणा लागतो, पूर्वी किल्ल्यांची दुरुस्ती करण्यासाठी सर्व गडांवर असे घाणे असायचे. तिथेच चुना मळून दुरुस्तीला वापरला जायचा. इथे शिवदुर्ग संवर्धन या संस्थेने बरेच संवर्धनाचे काम केलेले आहे. तेव्हा मातीत गाडला गेलेला हा चुन्याचा घाणा सुद्धा त्यांनी साफ करून घेतला, तसेच वर जायच्या पडलेल्या पायऱ्या बांधून घेतल्या, भिंतीतल्या मारुतीला पण आधार देऊन त्याची पडझड थांबवली.

कसे जाल?

पुण्याहून पौड मार्गे काशीग या गावी जाता येते किंवा पीएमपीएमएल बसने कोळवणला जाऊन तिथून पुढे जीपने काशीगला जाता येते. तळेगावहून काळे कॉलनी मार्गे बसने पायथ्याला जाता येत. तिकोनाला दोन बाजूला पायथ्याला गाव आहे. काशीग आणि जवण ही दोन गावे एका बाजूला आणि पेठ तिकोना हे दुसऱ्या बाजूला. इथून दोन वाटा आहेत. काशीग किंवा जवण हून येणारी वाट त्यातल्या एका वाटेला येऊन मिळते. अशा दोन वाटा गडावर जातात. पुण्याहून जाताना हडशी गावातल्या साईबाबा मंदिराला पण भेट देता येईल.

काय पहाल?

तटबंदी, दरवाजे, भिंतीतला मारुती, सातवाहन कालीन गुहा, चुन्याचा घाणा, बुरूज, महादेव मंदिर, पाण्याचे खडकात खोदलेले टाके, वाड्याचे आणि सदरेचे अवशेष. पायथ्याला नाश्ता आणि जेवणाची सोय होऊ शकते.

- सतीश मराठे, इतिहासप्रेमी- गिर्यारोहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT