chhatrapati sambhaji maharaj samadhi sakal
पुणे

Vadhu Budruk Tulapur : पुणे परिसर दर्शन : वढू, तुळापूर भळभळती जखम

शिवरायांनी उभ्या केलेल्या स्वराज्यावर त्यांच्या पश्चात खुद्द औरंगजेब चालून आला, प्रचंड मोठी फौज त्याच्या सोबत होती.

सकाळ वृत्तसेवा

शिवरायांनी उभ्या केलेल्या स्वराज्यावर त्यांच्या पश्चात खुद्द औरंगजेब चालून आला, प्रचंड मोठी फौज त्याच्या सोबत होती.

शिवरायांनी उभ्या केलेल्या स्वराज्यावर त्यांच्या पश्चात खुद्द औरंगजेब चालून आला, प्रचंड मोठी फौज त्याच्या सोबत होती. पहिल्या तीन वर्षात त्यानी कुतुबशहा आणि आदिलशहा यांचा पूर्ण पराभव केला आणि आता मराठ्यांचा पराभव करून संपूर्ण हिंदुस्थानावर मोगली कब्जा प्रस्थापित करायचा, असे ठरवून तो स्वराज्यावर चालून आला.

बलाढ्य औरंगजेब चालून आला या गोष्टीचा फायदा उठवण्यासाठी सिद्धी आणि पोर्तुगीज पण सरसावून उठले. असे सगळीकडून शत्रू चालून येत होते, महाराजांनंतर स्वराज्याची घडी बसलेली नव्हती. अशा संकट समयी एखादा घाबरून गेला असता, पण भीती हा शब्दच माहीत नसलेले संभाजी राजे हे स्वराज्याचे द्वितीय छत्रपती होते. त्यांनी अत्यंत साहसाने चहूबाजूच्या शत्रूंना आपल्या तलवारीचे पाणी पाजले. असा हा शूर, धाडसी राजा दुर्दैवाने औरंगजेबाच्या हाती सापडला, त्याने त्यांना अनेक अमिषे दाखवली, भीती दाखवली, हाल हाल केले पण हा नरसिंह बधला नाही. अखेर ११ मार्च १६८९ रोजी या जिगरबाज राजाचा मृत्यू झाला. ही मराठा इतिहासातील एक बरी न होणारी जखम आहे.

त्यांचा मृत्यू वढू बुद्रूक येथे झाला. नंतर त्यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी या ठिकाणी त्यांची समाधि आणि वृंदावन बांधले. आज ही समाधी असंख्य इतिहास प्रेमी आणि संभाजी महाराजांच्या भक्तांना प्रेरणा देत आहे. इथे शेजारीच कवी कलश यांचीसुद्धा समाधी आहे. तसेच संभाजी महाराजांच्या आयुष्यातील काही प्रसंग चितारलेले एक छोटे चित्ररूप संग्रहालयही आहे. संभाजी महाराजांनी रामसिंग यास लिहिलेले एक पत्र इथे लावलेले आहे. यात त्यांच्या करारी स्वभावाची झलक दिसते. जवळच भीमा, भामा आणि इंद्रायणी यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले संगमेश्वर आणि इतर अनेक मंदिरे असलेले तुळापूर हे पुरातन गाव आहे. इथेही भेट देता येईल.

काय पहाल?

संभाजी महाराज समाधी, कवी कलश समाधी, छोटेसे चित्र प्रदर्शन, तुळापूर येथील संगमेश्वराचे पुरातन मंदिर आणि इतर मंदिरे, तीन नद्यांचा संगम

कसे पोहचाल

पुण्याहून बसने किंवा खासगी वाहनाने जाता येते.

- सतीश मराठे, इतिहासप्रेमी-गिर्यारोहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News: निलेश घायवळ टोळीतील फरार सदस्य जयेश वाघला अटक; कोथरूड गोळीबार प्रकरणात होता सहभाग

आर्यनच्या दिग्दर्शनाखाली शाहरुखचं शूटिंग? बाप-लेकाची जुगलबंदी रंगणार, लेकाच्या चित्रपटात वडिलांची मुख्य भूमिका!

Kolhapur Sugarcane : ऊसदर आंदोलनापासून १० वर्षे लांब राहिलेले माजी आमदार उल्हास पाटलांची अचानक एन्ट्री, 'आंदोलन अंकुश'ला पाठींबा; Video Viral

Kolhapur Drugs Deal : १२ ग्रॅम एमडी ड्रग्जसाठी लाखो रुपयांची डील; पुणे-बंगळुरू हायवेवर पोलिसांची सिने स्टाईल कारवाई

Kidney Disease: भारतात किडनीच्या आजारांचा विळखा, तब्बल 10 कोटींपेक्षा जास्त रुग्ण, अहवालात धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT