waste water treatment project sakal
पुणे

Pune News : सांडपाणी प्रक्रिया प्रकल्‍पाचा सव्वा चारशे कोटीचा आराखडा केंद्राकडे

पुणे शहरात वाहणाऱ्या मुळा नदीमध्ये प्रक्रिया न केलेले घरगुती व उद्योगांचे सांडपाणी येत असल्याने प्रदूषण वाढले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरातील महापालिकेचे कालबाह्य झालेले सहा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्ययावत करण्यासाठीच्या सर्वंकष प्रकल्प आराखड्यास (डीपीआर) महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणाने (एमजीपी) मान्यता दिली आहे. त्यामुळे आता केंद्र शासनाकडून या प्रकल्पास अंतिम मान्यता मिळण्यासह या कामासाठी ४२५ कोटी रुपयांचा निधी मिळण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान हा आराखडा मंजुरीचे काम संथ गतीने सुरु असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने ऑगस्ट महिन्यात दिले होते.

शहरात वाहणाऱ्या मुळा नदीमध्ये प्रक्रिया न केलेले घरगुती व उद्योगांचे सांडपाणी येत असल्याने प्रदूषण वाढले आहे. नदीतील बीओडीचे प्रमाण कमी करून, सोओडी आणि विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढविणे आवश्‍यक आहे. महापालिकेने २००८ पूर्वी शहरात १० मैला शुद्धीकरण केंद्र उभारले. त्यापैकी नऊ प्रकल्प सध्या अस्तित्वात आहेत.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुधारित निकषानुसार पाण्यातील बीओडीचे प्रमाण हे ३० मिलीग्रॅमऐवजी १० मिलीग्रॅम पर्यंत कमी करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी महापालिकेच्या ९ पैकी ६ प्रकल्पांमध्ये ‘एसबीआर’ हे तंत्रज्ञानाचा नसल्याने निकषांची पूर्तता होत नव्हती.

त्यामुळे विठ्ठलवाडी, एरंडवणा, बोपोडी, भैरोबानाला, तानाजीवाडी, नायडू या सहा प्रकल्पांमधील तंत्रज्ञान अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला. यासाठी ‘महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित’ला (महाप्रित) सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. ‘महाप्रित’ने सहा प्रकल्पांचा ४२५ कोटी रुपयांचा सुधारित आराखडा तयार केला असून, यासाठी केंद्र सरकारच्या ‘अमृत’ योजनेतून निधी प्राप्त होणार आहे.

‘महाप्रित’ने तयार केलेला डीपीआर ‘एमजीपी’ तपासणीसाठी पाठविला होता. त्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याच वेळेस महापालिकेने हा प्रकल्प आराखडा केंद्र सरकारकडेही पाठवलेला आहे. एमजीपीने मान्यता दिल्याने केंद्राकडूनही त्यास मान्यता मिळेल. तसेच यासाठी निधी लगेच प्राप्त होणार असून, एका महिन्यात निविदा प्रक्रिया सुरु करू. या सहा प्रकल्पांचे काम पूर्ण झाल्यानंतर शुद्धीकरणाचे प्रमाण वाढेलच, शिवाय सांडपाणी शुद्ध करण्याचे प्रमाण ९९ एमएलडीने वाढणार आहे, असा दावा प्रशासनाने केला आहे.

‘शहरातील ९ पैकी ६ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील तंत्रज्ञान अद्ययावत करण्याचा आराखडा एमजीपीने मान्य केला आहे. या आराखड्यास केंद्र सरकारकडून त्वरित मान्यता मिळेल. पुढील महिन्याभरात ही मान्यता मिळाल्यानंतर लगेच निविदा प्रक्रिया राबविली जाईल. या प्रकल्पामुळे मुळामुठा नदीतील शुद्ध पाण्याचे प्रमाण वाढणार आहे,’

- श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग

प्रकल्पाची सध्याची क्षमता आणि भविष्यातील क्षमता (एमएलडी)

भैरोबा - १३० - २००

एरंडवणे - ५० -५०

तानाजीवाडी - १७ - २६

बोपोडी - १८ - २८

विठ्ठलवाडी - ३२ -३२

नायडू नवीन - ११५ - १२५

बाणेर - ३० - ३०

मुंढवा - ४५ - ४५

खराडी - ४० -४०

एकूण - ४७७ - ५७६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

VSI Land Approval: जालन्यात व्हीएसआयला अतिरिक्त जमिनीला शासनाची मंजुरी; सौरऊर्जा प्रकल्प, पंपगृह व ऊस रोप निर्मिती उपक्रमांना वेग

Pune Civic Alert: अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी महापालिका सतर्क; ताफ्याच्या मार्गावरील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT