Pune Traffic sakal
पुणे

Pune Traffic : पुण्यात दहा ‘हॉटस्पॉट’ निश्चित ; पोलिस आयुक्त अमितेश कुमार,वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आराखडा

पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दहा ‘हॉटस्पॉट’ निश्चित केले आहेत. ट्रॅफिक वॉर्डनची संख्या दोनशेवरून सातशे करण्यात येईल.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दहा ‘हॉटस्पॉट’ निश्चित केले आहेत. ट्रॅफिक वॉर्डनची संख्या दोनशेवरून सातशे करण्यात येईल. पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी पुणे महापालिका आणि संबंधित घटकांच्या मदतीने ‘कृती आराखडा’ तयार करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी (ता. १६) ‘सकाळ’ कार्यालयात सदिच्छा भेट दिली. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात वाघोली, गणेशखिंड रस्त्यावरील सिमला ऑफिस, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आचार्य आनंद ऋषीजी चौक परिसर घेण्यात आला आहे. मेट्रोकडून लावण्यात आलेले बॅरिकेड काम संपले की लगेच दूर करावेत, तसेच खड्डे बुजविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी सध्या ट्रॅफिक वॉर्डनची संख्या दोनशेच्या जवळपास आहे. ही संख्या सातशे करण्यात येणार आहे. ’’

अवजड वाहनांच्या वेळेबाबत परिपत्रक

वाघोली आणि गणेशखिंड या रस्त्यांवर ‘पीक अवर’मध्ये आराम बस, खडी वाहतूक करणारे डंपर आणि अवजड वाहनांना मनाई करण्यात आली आहे. त्यासाठी सकाळी ९ ते १२ आणि सायंकाळी ५ ते ८.३० वाजेपर्यंत ही वेळ निश्चित केली आहे. अन्य रस्त्यांवर अवजड वाहनांच्या वाहतुकीच्या वेळेबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.

गतिरोधकांचा धोका दूर करणार

पुणे शहरात धोकादायक गतिरोधकांमुळे अपघात होत आहेत. वाहनचालक, रुग्ण, ज्येष्ठ नागरिकांना ते गैरसोयीचे ठरत आहेत. त्यावर शहरातील गतिरोधकांचा आढावा घेण्यात येत आहे. प्रायोगिक तत्त्वावर काही रस्त्यांवर धोकादायक गतिरोधक काढण्याबाबत महापालिका प्रशासनाशी चर्चा करण्यात येईल, असे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT