Pune Metro sakal
पुणे

Pune Metro : विमानतळापर्यंत मेट्रोचा विस्तार धूसरच ; नव्याने करावी लागणार मार्गांची आखणी

वनाज ते रामवाडी दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पातून एक मार्ग लोहगाव विमानतळापर्यंत नेण्याची योजना कागदोपत्रीच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लोहगाव विमानतळापर्यंत मेट्रो सेवा द्यायची झाल्यास नवीन मेट्रो मार्ग तयार करावा लागणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वनाज ते रामवाडी दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पातून एक मार्ग लोहगाव विमानतळापर्यंत नेण्याची योजना कागदोपत्रीच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लोहगाव विमानतळापर्यंत मेट्रो सेवा द्यायची झाल्यास नवीन मेट्रो मार्ग तयार करावा लागणार आहे. त्यामुळे सध्या तरी विमानतळापर्यंत मेट्रोचा विस्तार होण्याची शक्यता धूसर असल्याचे समोर आले आहे.

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने आणि महापालिकेने तीन मेट्रो मार्गिकेची कामे हाती घेतली आहे. त्यापैकी वनाज ते रामवाडी दरम्यानचे काम महामेट्रोकडून हाती घेण्यात आले आहे. या मार्गाचा आराखडा दिल्ली मेट्रोने तयार केला आहे. त्यामध्ये या मार्गातून लोहगाव विमानतळापर्यंत जाण्यासाठीचा एक मार्ग करावा, अशी मागणी गेली अनेक वर्षे होत आहे. तशी सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी देखील केली होती. प्रत्यक्षात मात्र त्यांची पूर्तता होऊ शकत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

  • ‘पीएमआरडीए’ने तयार केलेल्या वाहतूक सर्वंकष आराखड्याचे (सीएमपी) पुनर्विलोकन करण्याचे काम महामेट्रोकडून हाती

  • त्यामध्ये ही गोष्ट निदर्शनास

  • सध्या सुरू असलेल्या वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गावरून एक मार्ग लोहगाव विमानतळाकडे नेणे शक्य नाही

  • करण या मार्गाची आणखी करताना तसा कोणतीही विचार करण्यात आलेला नाही

  • या मार्गाचा जो आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये तशी तरतूददेखील करण्यात आलेली नाही

  • तरीदेखील या मार्गाचे काम करावयाचे झाल्यास सध्या असलेले काम थांबवावे लागेल

  • सध्याच्या मार्गात तोडफोड करून लोहगाव विमानतळाकडे जाण्यासाठीच्या मार्गासाठी नव्याने बदल करावा लागेल

  • त्यासाठी किमान दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो

  • त्यासाठी राज्य सरकार आणि महापालिकेला धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल.

सध्या तरी प्रस्ताव कागदोपत्रीच

लोहगाव विमानतळापर्यंत मेट्रो नेण्यासाठी अनेक अडचणी असल्याने नवीन पर्यायी मार्गांचा विचार करावा लागणार आहे. सध्या महामेट्रोकडून ‘सीएमसी’ आराखड्याचे पुनर्विलोकनाचे काम सुरू आहे. त्यामध्ये या गोष्टींचा विचार होऊ शकतो, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे सध्यातरी लोहगाव विमानतळापर्यंत मेट्रो नेण्याचा प्रस्ताव कागदोपत्रीच असल्याचे समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

'त्या'व्हायरल व्हिडीओवर अखेर गौतमी पाटील बोलली, म्हणाली... 'लाज नाही वाटली?'

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

Mumbai News: जीटीबीनगरवासीयांना भाड्याचा दिलासा! निवासींना २० तर गाळेधारकांना १० हजार रुपये

Pachod News : दावरवाडी परिसरातील सहा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रेच पडलीत आजारी!

SCROLL FOR NEXT