accident  sakal
पुणे

Plane Accident : बारामतीनजिक प्रशिक्षणार्थी विमान पुन्हा कोसळले...

या अपघातात वैमानिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

मिलिंद संगई, बारामती..

बारामती- येथील रेड बर्ड कंपनीचे विमान रविवारी सकाळी सातच्या सुमारास जुना सह्याद्री काऊ फार्मनजिक लोखंडे वस्तीच्या वरील बाजूस अपघातग्रस्त झाले. व्हीटी आरव्हीटी टेक्नम या जातीचे दोन सीटर विमान होते. विमान एका शेतात अचानक कोसळले. दोनच दिवसांपूर्वी याच रेड बर्ड कंपनीचे विमान बारामती विमानतळानजिक अपघातग्रस्त झाले होते. आज पुन्हा दुसरा अपघात झाल्यानंतर वैमानिकांसह विमानतळानजिक असलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

या अपघातात वैमानिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. बारामतीत सुरु असलेल्या प्रशिक्षण संस्थेचा गेल्या काही दिवसातील हा पाचवा अपघात आहे. काही महिन्यांपूर्वी मेखळी येथे नीरा नदीच्या पुलाखालून विमान घालण्याच्या नादात अपघात झाला होता. फेब्रुवारी 2019 मध्ये रुई बाबीर गावात अपघात झाला होता. 2022 मध्ये इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथे तातडीचे लँडिग करावे लागले होते. दोनच दिवसांपूर्वी रेड बर्ड कंपनीच्याच विमानाचा विमानतळानजिक अपघात झाला होता.

आजचा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती मिळू शकलेली नाही. आजच्या अपघातातही विमानाच्या पुढील बाजूचे नुकसान झाले असून विमान उलटे पडल्याचे दिसत आहे.,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, LSG vs GT: जॉस बटलर - शुभमन गिल बरसले, गुजरातचा सलग दुसरा विजय; रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का

Coal Rate: आता वीज बिल वाढणार नाही! कोल इंडियाचा मोठा निर्णय; उद्योग आणि ग्राहकांना मोठा दिलासा

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Breaking News Live Update: संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील एलओपी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

SCROLL FOR NEXT