Plane Cargo Service sakal
पुणे

Plane Cargo Service : पुण्यातील कार्गो आयात सेवा ‘हवेत’च

पुणे विमानतळावर देशांतर्गत (डोमेस्टिक) कार्गोला चांगला प्रतिसाद लाभत असला तरीही कार्गोची आयातची (इंपोर्ट) सेवा अद्याप सुरू झालेली नाही.

सकाळ वृत्तसेवा

- प्रसाद कानडे

पुणे - पुणे विमानतळावर देशांतर्गत (डोमेस्टिक) कार्गोला चांगला प्रतिसाद लाभत असला तरीही कार्गोची आयातची (इंपोर्ट) सेवा अद्याप सुरू झालेली नाही. विमानतळ प्रशासनाने ही सेवा सुरू व्हावी यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. यात स्ट्राँग रूमपासून ते ‘डीजी’पर्यंतचा समावेश आहे.

आतापर्यंत दोन कंपन्यांनी विचारणा देखील केली. मात्र काही केल्या ‘कार्गो आयात’ची सेवा सुरू होत नाही. ही सेवा सुरू करण्यासाठी ‘ट्रेड’चा सहभाग असणे आवश्यक आहे. मात्र त्यांचा प्रतिसाद लाभत नसल्याने ही सेवा सुरू होत नाही. याचा फटका पुणेकरांना बसत आहे.

विमानतळ प्रशासनाने कार्गो वाहतुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या काही दिवसांत देशांतर्गत कार्गोला चांगला प्रतिसाद लाभत आहे. निर्यातची सेवा देखील नुकतीच सुरू झाली. यात सिंगापूर व दुबईसाठी मालाची निर्यात केली जात आहे. सिंगापूरला सातत्याने ऑटो पार्टची वाहतूक होते. तर काही दिवसांपूर्वी बाकरवडीदेखील पाठविण्यात आली आहे.

सिंगापूरला आतापर्यंत सुमारे १२ टन माल पुण्याहून पाठविण्यात आला आहे. तर दोन दिवसांपूर्वी दुबईसाठी सेवा सुरू झाली आहे. दुबईलादेखील ऑटो पार्ट पाठविण्यात येत आहेत.

प्रशासनाने दिलेल्या सुविधा

1) एक हजार डॉलरपेक्षा अधिक मूल्य असलेल्या वस्तू ठेवण्यासाठी स्ट्राँग रूमची आवश्यकता असते.

2) विमानतळाच्या कार्गो टर्मिनल येथे स्ट्राँग रूम तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे येथे सोने, चांदी ते अन्य महागड्या वस्तू सहज ठेवता येईल. वस्तूची सुरक्षितता कायम राखण्यास मदत होईल.

3) कोल्ड स्टोरेजचीदेखील सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे नाशवंत वस्तूंची वाहतूक सुरक्षितपणे करता येईल.

4) डीजी अर्थात डेंजरस गुड्स यासाठी स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. यात स्फोटकापासून ज्वलनशील पदार्थांपर्यंत वस्तू सुरक्षित ठेवता येतील.

5) कोणत्याही विमानतळावर ‘इंपोर्ट’ची सोय सुरू होण्यासाठी किमान या बाबींची आवश्यकता असते. पुणे विमानतळ प्रशासनाने या सुविधांची पूर्तता केलेली आहे.

इंपोर्ट आणि एक्सपोर्टचा फायदा काय?

  • छोट्या व मोठ्या उद्योजकांना आपल्या व्यवसायाच्या विकासाला चालना मिळते

  • कमी वेळात मालाची उपलब्धता

  • पैशाची बचत

  • मालाची किंमत अन्य शहराच्या तुलनेत कमी किमतीत उपलब्ध

आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा ‘प्रवास’

  • पुण्यातून आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा सुरू होण्याआधी मालवाहतुकीची सेवा सुरू झाली

  • १४ एप्रिल २००५ रोजी पहिल्या आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीचे उड्डाण झाले

  • १२ डिसेंबर २००५ रोजी पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानाचे दुबईकडे उड्डाण झाले

  • १३ डिसेंबर २००५ रोजी सिंगापूरकडे प्रवासी विमानाचे उड्डाण

पुणे विमानतळावरून निर्यातची सुविधा सुरू झालेली आहे. मात्र आयातला आवश्यक असा प्रतिसाद मिळत नसल्याने ही सुविधा अद्याप सुरू झालेली नाही. ही सेवा सुरू व्हावी यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा कार्गो टर्मिनलवर उपलब्ध केल्या आहेत. मात्र केवळ चौकशीच सुरू आहे.

- प्रदीप कुमार, उप सरव्यवस्थापक, कार्गो टर्मिनल, पुणे विमानतळ

पुणे विमानतळ प्रशासनाने केवळ प्रवासी विमानातून कार्गोची वाहतुकीला प्राधान्य न देता, मालवाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘फ्रेटर्स’ विमानांचा वापर करावा. त्या दृष्टीने प्रयत्न आवश्यक आहे. तसेच उद्योजकांशी चर्चा करून इंपोर्ट व एक्स्पोर्ट वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.

- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Stock Market Holiday: 3 एप्रिलला शेअर बाजार बंद? सलग 3 दिवस बाजार बंद राहणार! जाणून घ्या अपडेट

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

SCROLL FOR NEXT