पुणे

कडधे विद्यालयात सत्तर रोपांची लागवड

CD

चास, ता. ७ : कडधे (ता. खेड) येथील श्री सिद्धेश्वर विद्यालय वेताळेच्या भागशाळेत कडधे विद्यालयाच्या परिसरात बुधवारी (ता. ५) पर्यावरण दिन उत्साहात साजरा केला. यावेळी उपस्थितांच्यावतीने सत्तर झाडांचे रोपण केले.

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून एच. वाय. टी. इंजिनिअरिंग पिंपरी पुणे या कंपनीच्या समुहाने विद्यालयात येऊन वृक्षारोपण केले. यावेळी त्यांनी आंबा, चिंच आणि निंब यांची ७० रोपांची लागवड केली. त्याचप्रमाणे शाळेभोवताली असणाऱ्या सर्व वृक्षांना पाणी देण्यासाठी पाण्याची ड्रीप लाईन सिस्टीमसह मंजूर केली.

याप्रसंगी एच. वाय. टी. कंपनीचे अॅनी अलबुक्युरक्यु, वर्षा हुले, संध्या सिंग, संभाजी यादव, बाळासाहेब राठोड, प्रेमराज वागस्कर, विनय सांगोलकर, चंद्रकांत सहाणे आणि हर्षद कोबल उपस्थित होते. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब रणपिसे यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार मिलिंद कोबल यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Kolad Road Accident : पुणे-कोलाड मार्गावर लवळे फाट्याजवळ भीषण अपघात; सिमेंटच्या ट्रकने कार-दुचाकींना उडवले, एकजण जागीच ठार, दोघे गंभीर

प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवा ट्विस्ट! गोळी आरोपीलाही लागल्याची शक्यता, एसआयटीकडून पुरावे संकलित

मुंबईत आंदोलन करणं CJPला महागात पडलं! अभिजीत दिपकेंसह सर्व आंदोलकांवर गुन्हा दाखल, पोलिसांची कडक कारवाई

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Sarva Pitri Amavasya 2026: यंदा सर्वपित्री अमावस्या कधी आहे? जाणून घ्या शुभ तिथी, तर्पण मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT