पुणे

जेजुरीत प्लॅस्टिकबंदीची कारवाई तीव्र करणार : संजय केदार 

सकाळवृत्तसेवा

जेजुरी : जेजुरी शहरामध्ये महाराष्ट्र प्लॅस्टिक व अविघटनशील कचरा नियंत्रण कायद्यान्वये प्लॅस्टिक, थर्मोकोल तत्सम वस्तूंचा वापर करू नये यासंदर्भात जेजुरी पालिकेने जनजागृती केली आहे. तसेच या महिन्यात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या पुढे शहरात प्लॅस्टिक बंदी अधिनियमाची कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा जेजुरी पालिकेचे मुख्याधिकारी संजय केदार यांनी दिला. 

घरातील दुकानातील ओला व सुका कचरा, त्याचे वर्गीकरण याबाबत घरोघरी कचराकुंडी देऊन माहिती देण्यात आली आहे. 11 सप्टेंबरपासून नियम न पाळणाऱ्या दुकानदारांवर प्रत्यक्षात कारवाई करून एक लाखाचा दंडही वसूल करण्यात आला आहे. यापुढे ही कारवाई तीव्र करण्यात येणार असल्याचे जेजुरी पालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. 

महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे विभागीय अधिकारी नितीन शिंदे, एम. जे. भोई तसेच जेजुरी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक यांनी शहरातील प्लॅस्टिक वापराबद्दल नुकतीच पाहणी केली. जेजुरी पालिकेचे नोडल अधिकारी बाळासाहेब बगाडे, स्वच्छता पर्यवेक्षक प्रसाद जगताप, आरोग्य विभागाचे अधिकारी राजेंद्र गाढवे, सुनील दोडके आदी कर्मचाऱ्यांनी शहरातील दुकानांची पाहणी करून प्लॅस्टिक, थर्माकोलच्या वस्तूंचा वापर करू नये, असे आवाहन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : महिला अपहरणप्रकरणी रेवण्णा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT