मोरवाडी चौक, पिंपरी - ‘सकाळ’च्या छायाचित्रकाराने कॅमेरा काढताच कॅरिबॅग विक्रेत्यांनी काढलेला पळ. 
पुणे

...अन्‌ कॅरिबॅग विक्रेत्यांनी केले पलायन

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक वस्तू व कॅरिबॅगवर राज्य सरकारने सहा महिन्यांपूर्वी बंदी घातली आहे. तरीही शहरात त्यांचा वापर सर्रास होतो आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘कॅरिबॅग येतात कुठून?’ याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, काही जण शहरातील सिग्नलवर कॅरिबॅग विकत असल्याचे आढळले. त्यांचे छायाचित्र घेण्यासाठी कॅमेरा काढताच, सर्वांनी कॅरिबॅग ठेवलेल्या पिशव्या घेऊन पळ काढला. साधारणतः दोन-अडीच तास सिग्नलवर कुणीही फिरकले नाही. सायंकाळी परिस्थिती जैसे-थे आढळली. ठिकाण होते महापालिका भवनाजवळील मोरवाडी चौक. प्लॅस्टिक व कॅरिबॅग बंदीबाबत महापालिकेने वेळोवेळी जनजागृती केली आहे. तरीही कॅरिबॅग आढळलेल्या विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल केला. तरीसुद्धा कॅरिबॅग मोठ्या प्रमाणात शहरात आढळत आहेत.

प्रसंग  १ - पिंपरी - हातगाडीवर भाजीपाला विक्रेत्याकडून एका तरुणाने भाजी घेतली. ती ठेवण्यासाठी कॅरिबॅग मागितली. पैशांचा ड्रॉवर खालून विक्रेत्याने हळूच कॅरिबॅग काढून दिली. 

२ - भोसरी - फरसाण विक्रीचे दुकान. वानगीदाखल ठेवलेले फरसाण ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशवीत होते. ‘कॅरिबॅगवर बंदी आहे, अशा पिशव्या सुरू आहेत,’ असे उत्तर विक्रेत्याने दिले. 

३ - चऱ्होली - दूध डेअरीवर एक लिटर ताक मागितले. ‘भांडं आणा’, असे विक्रेत्याने सांगितले. तसाच परत निघालो. तो म्हणाला, ‘‘थांबा, दुधासाठी वापरत असलेल्या पिशवीत घेऊन जा.’’

अशी ही बनवाबनवी
शहरातील सिग्नलवर मिळणाऱ्या कॅरिबॅग व डस्टबीनसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्या उल्हासनगरहून आणल्या जात असल्याचे त्या विकणाऱ्यांकडून समजले. त्यांच्याकडील पिशव्यांच्या पॅकिंगवर ५१ मायक्रॉन असे लिहिलेले आहे. विशेषतः त्यांच्याकडील पिशव्या खूपच पातळ असून ५१ मायक्रॉन शब्द वापरून बनवाबनवी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, Lord's ODI: इंग्लंडला RO-KO नडले, पण अखेर भारतीय संघाचा प्रयत्न तोकडे पडले! यजमानांनी विजयासह मालिकाही जिंकली

IND vs ENG: रोहित शर्माच्या शतकात LORD शार्दुल ठाकूरचं मोठं योगदान, पण कसं? जाणून घ्या नेमकं गुपित

ENG vs IND: Rohit Sharma चा लॉर्ड्सवर 'हिटमॅन' अवतार; शतक ठोकत इतिहास घडवला, गिलसोबतही केली विक्रमी भागीदारी

Parliament March Row: परवानगी मागितली नाही, दिलीही नाही; कलम १६३ लागू, संसद मार्चला दिल्ली पोलिसांचा स्पष्ट नकार

FIFA World Cup Final चा फिव्हर भारतातही! तीन राज्यातील शाळांना थेट सरकारी सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT