Plastic-bag 
पुणे

प्लॅस्टिक वापराच्या दंडाची तोतयांकडून शहरात वसुली

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - ‘प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी महापालिकेने मार्च २०१८ पासून सुरू केली आहे. तरीही व्यापारी व नागरिक कॅरिबॅग व बंदी असलेल्या प्लॅस्टिक वस्तूंचा वापर करीत आहेत. त्यांच्यावर महापालिका दंडात्मक कारवाई करीत आहे. मात्र, अशी कारवाई तोतया अधिकारी व कर्मचारीही करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा संशयित व्यक्ती आढळल्यास महापालिकेशी संपर्क साधावा’’, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी केले आहे. 

राज्य सरकारच्या आदेशानुसार प्लॅस्टिकचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी व साठवणुकीवर बंदी आहे. त्यानुसार महापालिकेने २३ मार्च २०१८ पासून शहरात प्लॅस्टिक बंदी जाहीर केली. मात्र, काही ठिकाणी पालिकेचा कर्मचारी वा अधिकारी नसलेले व्यक्ती (तोतया) दुकानदारांकडून प्लॅस्टिकबंदी संदर्भात दंड आकारत आहेत. त्यामुळे शहरातील सर्व नागरिक, खासगी आस्थापना, दुकाने व औद्योगिक आस्थापना यांनी सावधगिरी बाळगावी. संबंधित कर्मचारी हे पालिकेचे अधिकारी व कर्मचारी असल्याची खातरजमा करावी. आवश्‍यकता वाटल्यास त्यांचे ओळखपत्र तपासावे, दंडाची रक्‍कम भरल्यानंतर अधिकृतपणे पावती घ्यावी. कारवाई करणारी व्यक्ती तोतया असल्याचे आढळून आल्यास ९९२२५०१११८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रॉय यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'ला काळीमा? लॉकअपमध्ये असलेल्या आरोपीकडे मुलीला ‘एका रात्रीसाठी’ पाठवण्याची कथित मागणी

IPL 2026: श्रेयस अय्यरवर BCCI ची मोठ्या किंमतीच्या दंडाची कारवाई; PBKS vs GT सामन्यात झालेली चूक

Pune Municipal Property: पुणे महापालिकेच्या ताब्यातील चार हजार मिळकती बेवारस; प्रॉपर्टी कार्डवर नोंदच नाही, मालमत्ता विभागाचे दुर्लक्ष!

IPL 2026 PKBS vs GT : गुजरातविरुद्ध सामन्यात पंजाब किंग्जला विजय मिळून देणारा कूपर कोनोली नेमका कोण? रिंकी पाँटिंगशी आहे खास कनेक्शन...

Mumbai News: प्रामाणिक कामगिरीतूनच यश; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ‘यिन’ अधिवेशनात युवकांना मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT