pune esakal
पुणे

Pune Crime: अबब..! एक थाळी पडली चक्क दोन लाख रूपयांना; पुण्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस

एक थाळी पडली दोन लाख रुपयांना

रुपेश नामदास

पुणे, ता. २७ : एखाद्या वस्तूवर एक मोफत म्हटले की ते आमिष किती महागात पडू शकते... तर पुण्यातील एका महिलेला जेवणाची एक थाळी पडलीय चक्क एक लाख ९९ हजार रुपयांना. सायबर चोरट्यांनी एका महिलेला फेसबुकवर ‘एका थाळीवर एक थाळी फ्री’ची ऑफर देत एक लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी एका महिलेने (वय ३८, रा. शुक्रवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार खडक पोलिस ठाण्यात प्रकाश कुमार (रा. गार्डन बाजार, फुलबडी, जि. मुन्नर, केरळ) आणि त्याच्या चार साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २२ जुलै २०२२ रोजी घडला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आईच्या फेसबुकवर पुण्यातील एका नामांकित हॉटेलची ‘एका थाळीवर एक थाळी फ्री’ अशी जाहिरात दिली होती. फिर्यादी यांच्या वडिलांनी त्यावरील मोबाईल क्रमांकावर फोन केला.

त्या वेळी आरोपी प्रकाश कुमार याने त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवरून एक लाख ९९ हजार रुपये काढून घेतले. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता यादव करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan EMI: महिन्याला ३.५ लाख पगार, तरीही १.७ कोटींचं घर घेतलं नाही! EMI पाहून कपलने का घेतला मोठा निर्णय?

IND vs SL 2nd Test: श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीसाठी जाहीर केला १४ सदस्यीय संघ; दुखापतीचा फटका, तरी मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी मजबूत मोर्चेबांधणी

Viral News : खेळता खेळता ५ वर्षांच्या मुलीने गिळलं ५० ग्रॅम सोनं; डॉक्टरांनी असं काढलं बाहेर!

Marathi News Live Updates : जयपूरमध्ये आशुतोष यांच्यावर झालेल्या हल्लाचा अभिजीत दिपके यांनी केला निषेध

Mumbai News: पीओपी मूर्तींबाबत हायकोर्टाचा दिलासा, सहा फुटांवरील गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांत विसर्जनाचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT