पुणे

विद्यार्थी, नवउद्योजकांसाठी ऑस्ट्रेलियात व्यासपीठ

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ऑस्ट्रेलियात शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी व नवउद्योजकांसाठी ‘महाराष्ट्र बिझनेस अँड प्रोफेशनल कौन्सिल’ (एमबीपीसी) ऑस्ट्रेलिया या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. त्याद्वारे भारतीय विद्यार्थी आणि नवउद्योजकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

पुण्यातील किरण हुरकडली यांच्या पुढाकाराने ही संघटना स्थापन करण्यात आली आहे. करिअर मार्गदर्शन व व्यापारासाठी आवश्‍यक असलेल्या बाबी मिळण्यासाठी याद्वारे मदत करण्यात येणार आहे. ‘‘या संघटनेमार्फत आम्ही विद्यार्थ्यांना व उद्योजकांना करिअरसंदर्भात व व्यापारासंबंधी मोफत मार्गदर्शन करतो. उद्योजकांना प्रोत्साहन आणि नवउद्योजकांना पाठबळ देण्याचे कार्य करतो. शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियामध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना करिअरसंबंधित मार्गदर्शनाबरोबरच त्यांच्या राहण्याची सोय करण्यात येते,’’ अशी माहिती संघटनेचे उपाध्यक्ष किरण हुरकडली यांनी दिली.

संघटनेमध्ये सुमारे ४५० सदस्य आहेत. नवउद्योजकांसाठी मंथन सत्रे, प्रकल्पांची ओळख करणे, क्षमता निर्माण आणि संपर्क विकास, क्‍लस्टर डेव्हलपमेंटसारखे उपक्रम राबविण्यात येतात, असे हुरकडली यांनी सांगितले.

संस्थेचे मूळ कार्य 
    उद्योजकांना मोफत प्रशिक्षण व मार्गदर्शन देणे
    उद्योगाच्या गरजेनुसार नवीन क्षमता प्राप्त करण्यासाठी मदत करते
    ‘इंटर्नशिप’ आणि ‘ॲप्रेंटिस प्रोग्राम’मध्ये प्रवेश करण्यास मदत करणे
    व्यावसायिक नेटवर्क स्थापित करणे

नवउद्योजकांसाठी राबविण्यात येणारे कार्यक्रम
संघटना युवा विकास व प्रशिक्षण कार्यशाळा, नवउद्योजकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन, बॅंक वित्त मिळविण्यासाठी साह्य, निर्यात आणि बाजार विकासासाठी साह्य, सरकारी अधिकारी आणि बॅंकर्स यांच्याशी नवउद्योजकांचे संबंध स्थापित करण्यासारखे विविध कार्यक्रम आयोजित करते.

मी इंटिरिअर डिझायनर आहे. माझा हा व्यवसाय वाढविण्यासाठी एमबीपीसी या व्यासपीठाचा मला फायदा झाला असून, आज कित्येक प्रकल्पांसाठी मी काम करीत आहे. ही संघटना फक्त महाराष्ट्रातील नागरिकांसाठीच नसून सर्व भारतीयांसाठी कार्यरत आहे.
- रेश्‍मी गोरे, इंटिरिअर डिझायनर

शिक्षणासाठी मेलबर्नमध्ये आलो. येथे आल्यानंतर मला या संघटनेबाबत समजले. या संघटनेमधील सर्व सदस्य एकत्रित भारतीय सण साजरे करतात. यामुळे मी भारतातच आहे, असे नेहमी वाटते.
- आदित्य पुरोहित, मेलबर्न येथील भारतीय विद्यार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT