पुणे

वेल्ह्यातील घोमदांडवस्ती, टाकेवस्ती एक महिन्यापासून अंधारात; नागरीकांसह ,जनावरांचे मोठे हाल

मनोज कुंभार

वेल्हे (पुणे) : वेल्हे तालुक्यातील पानशेत परिसरातील घोमदांडवस्ती, टाकेवस्ती (धनगर वस्ती) गेल्या एक महिन्यापासून अंधारात असल्याने नागरीकांसह, जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. पानशेत परिसरातील टेकपोळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीत घोमदांड वस्ती, टाकेवस्ती पानशेत ते या वस्तींचे अंतर ४६ किलोमीटर आहे. या वस्त्यांवर दहा ते बारा घरे आहेत. या ठिकाणी चाळीस ते पन्नास नागरीक राहतात. या वस्तीवरील महावितरणचे विजेचे खांब पडले असून, गेल्या महिनाभरापासून या ठिकाणी वीज नसल्याने येथील नागरीकांचे मोठे हाल होत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी येथील महिलांना दोन ते तीन किलोमीटर पिण्याच्या पाण्यासाठी उन्हात वणवण करावी लागत आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येथील जनावरांचेसुध्दा मोठे हाल होत आहेत. याबाबत संबधित विभागाला वारंवार कळवूनही दुर्लक्ष केल्याने येथील नागरीकांनी या परिसरातील सामाजिक कार्येकते अजिंक्य पोळेकर यांच्याशी 
संपर्क साधला. या ठिकाणी २३ मार्च रोजी पोळेकर यांच्यासह सागर पोळेकर, आशिष उत्तेकर, सचिन मोरे, किरण पोळेकर यांनी या परिसराची पाहणी करत नागरीकांच्या अडचणी जाणून घेवून संबधित महिला नागरीकांचे फोटो व व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केले. याबाबतीत वाचा फोडण्यासाठी 'सकाळ'च्या वेल्हे बातमीदाराशी संपर्क साधला.

याबाबत महावितरणचे अभिजीत भोसले यांच्याशी संपर्क साधला असता याठिकाणी विजेच्या खांबाला जेसीबीची धडक बसल्याने याठिकाणचा विद्युत प्रवाह बंद पडला असून, दोन दिवसांतच या ठिकाणचा विद्युत प्रवाह चालू होईल.

येथील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नागरीकांसह, जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. -अजिंक्य पोळेकर, नागरिक 

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'T20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळाला, आता शुभमन गिल... ', पुजाराचे IPL 2026 साठी गुजरात टायटन्सबाबत मोठं भाकीत

Broiler Chicken : बॉयलर जिवंत कोंबड्यांना उच्चांकी दर; चिकनच्या दरात मोठी वाढ

Manchar News : कलमोडी प्रकल्पाच्या पाणी फेरनियोजनास राज्य शासनाची मान्यता; आंबेगाव व खेड तालुक्यातील ६,६२२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

MSRTC : गारगोटी आगाराची १८ लाख कमाई; आदमापूर यात्रेसाठी सहा दिवसांत साडेपाचशे जादा फेऱ्या

Water Plant Negligence : अन्यथा कळंबा फिल्टर हाउसच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावू; नगरसेवकांचा इशारा, ‘बी वॉर्ड’ चे दुरवस्थेवर बोट

SCROLL FOR NEXT