पुणे

निगडी प्राधिकरणात ‘प्लॅगेथॉन’ स्वच्छता मोहीम

CD

पिंपरी, ता. १९ : निगडी प्राधिकरणातील गणेश तलाव परिसर व वीर सावरकर उद्यान येथे ‘प्लॅगेथॉन’ (जॉगिंग किंवा चालताना वाटेतील कचरा संकलन करणे) ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिका आणि आर्मी पब्लिक स्कूल, देहूरोड यांच्यातर्फे हा उपक्रम राबवला.
उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, नागरिक आणि महापालिका कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोहिमेदरम्यान सुमारे ३५० किलो प्लॅस्टिक कचरा संकलित करण्यात आला. उपमहापौर बाबर यांनीही मोहिमेत सहभाग घेतला. प्रारंभी ‘माझी वसुंधरा’ची शपथ देण्यात आली. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, प्लॅस्टिकचा वापर कमी करणे आणि कचरा विलगीकरणाचे महत्त्व याबाबत जनजागृती करण्यात आली. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’च्या पार्श्वभूमीवर ओला, सुका, घातक व विशेष काळजीच्या कचऱ्याचे स्वतंत्र विलगीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deputy Collector: राज्यातील चाळीसपेक्षा जास्त तहसीलदारांचं प्रमोशन; नायब तहसीलदारांचीही तहसीलदारपदी पदोन्नती

Mirza Fakhrul Alamgir: बांगलादेशमध्ये मोठी राजकीय उलथापालथ! BNPचे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर नवे राष्ट्रपती, किती मतं मिळाली?

Virender Sehwag Son: जसा बाप, तसा बेटा! आर्यवीरचा शॉट पाहून चाहत्यांना झाली विरेंद्र सेहवागची आठवण, Video Viral

DJ वाल्यांनो लक्ष द्या! बेस-टॉपला हिरवा कंदील, ‘प्रेशर मिड’वर पोलिसांची नजर; पुण्यात गणेशोत्सवातील DJसाठी लवकरच नियमावली

Nalasopara Accident: भरधाव गाडीचा थरार; १६ वर्षांच्या मुलाने दोन महिलांना चिरडलं, एकीचा मृत्यू, एक गंभीर

SCROLL FOR NEXT