plot to tarnish the image of Manchar police by making old videos viral
plot to tarnish the image of Manchar police by making old videos viral 
पुणे

कोरोना काळातील व्हिडिओ पुन्हा व्हायरल; पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न

डी.के.वळसे पाटील

मंचर : “मंचर (ता.आंबेगाव) पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने अवैध व्यवसायिक व खंडणीखोर गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात पोलिसांने मारहान केलेला व्हिडिओ सोशल मिडीयावर सध्या व्हायरल करत आहेत. नागरिकांनी सोशल मीडियावर व्हायरल करताना सत्यता पडताळावी, अन्यथा चुकीचे मेसेज, व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांचा शोध घेऊन गुन्हे दाखल केले जातील.”असा इशारा मंचर पोलीस  ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी दिला आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

''गेल्या तीन दिवसापासून सोशल मीडियावर मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावडेवाडी (ता.आंबेगाव जि.पुणे) येथे आई-वडिलांना शेतात डबा घेऊन निघालेल्या मुलाला राक्षसी वृत्तीच्या पोलिसांची अमानुषपणे मारहाण'' अशा मजकुराचा मेसेज व पोलीस अंमलदार मुलाला काठीने मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सदरचा व्हिडिओ लॉकडाऊन कालावधीतील जून २०२०मधील आहे. संबंधित पोलिस आमलदार यांच्यावर कारवाई देखील झालेली आहे. सध्या मंचर पोलिसांनी अवैध व्यवसायिक व खंडणीखोर यांच्याविरुद्ध कारवाई सत्र सुरु केले आहे. त्यामुळे दुखावलेल्या अवैध व्यवसायिकाकडून जुनाच व्हिडिओ जाणून-बुजून पोलिसांची प्रतिमा खराब करण्यासाठी व्हायरल केला जात आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

पोलिसांबद्दल लोकांमध्ये गैरसमज व द्वेषाची भावना पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलीस खात्याची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न असून सदर व्हिडिओ कोणी व्हायरल केला याबाबत चौकशी सुरु झाली आहे. संबंधितांचा शोध मंचर पोलीस घेत आहेत.सदर जुना व्हिडिओ कोणीही  व्हायरल करू नये.असे आवाहन कोरे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT