पुणे

जयकुमार गोरे प्रेस सातारा

CD

‘प्रधानमंत्री आवास’च्‍या घरकुलांचे आज लोकार्पण

जयकुमार गोरे यांची माहिती; केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्‍यमंत्र्यांची उपस्थिती

सातारा, ता. १४ : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी मंजूर केलेल्या ३० लाख घरांपैकी पाच लाख घरे पूर्ण झाली आहेत. या घरांचे लोकार्पण तसेच योजनेसाठी १० हजार कोटींचे निधी वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते उद्या (शुक्रवार) सकाळी साडेअकरा वाजता येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर होणार आहे.
दरम्‍यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेनुसार काटकसरीचे धोरण राबवत आम्ही १५ हजार लाभार्थ्यांचा कार्यक्रम घेत आहोत, अशी माहिती ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी आज दिली.
कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज कार्यक्रमस्थळाची पाहणी मंत्री गोरे यांनी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, भाजपचे सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर, भाजपचे जिल्हा निवडणूक प्रमुख धैर्यशील कदम, सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, प्रवीण शहाणे, संदीप गिड्डे-पाटील, चिन्मय कुलकर्णी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
गोरे म्हणाले, ‘‘युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनावर आम्ही या कार्यक्रमात काटकसरीचे धोरण अवलंबले आहे. देशातील बेघरांना घरे देण्याचा संकल्प पंतप्रधान मोदींनी केला आहे. त्यातून महाराष्ट्राला ३० लाख घरांचे उद्दिष्ट होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ३० लाख घरांना मान्यता दिली. त्यापैकी एक वर्षात पाच लाख घरे बांधून पूर्ण केली असून, त्यांचे लोकार्पण होणार आहे. केंद्रीय ग्रामविकासमंत्री शिवराजसिंह चौहान या कार्यक्रमासाठी येत आहेत. या योजनेसाठी दहा हजार कोटी रुपयांचा निधी ते देणार आहेत. पुढील वर्षी दहा लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. पाच लाख घरांचे लोकार्पण करताना पाच प्रातिनिधिक लोकांना घरांच्या चाव्या या कार्यक्रमात दिल्या जाणार आहेत.’’
................................
कार्यक्रमासाठी एसटी बसची सुविधा
हा कार्यक्रम ५० हजार लाभार्थ्यांचा होता; पण पंतप्रधानांच्या सूचनेनुसार काटकसरीचे धोरण राबवत आम्ही १५ हजार लाभार्थ्यांचा कार्यक्रम घेत आहोत. त्यांना आणण्यासाठी एसटी बसची सुविधा केली आहे. यामध्ये घरांचे लोकार्पण आणि निधी वितरण तसेच लाभार्थी मेळावा, महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण होणार आहे.
................................
प्रत्‍येक घरावर सौर पॅनेल
या योजनेतून प्रतिघर एक लाख ४८ हजार रुपये आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले ५० हजारांचे अतिरिक्त अनुदान दिले आहे. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी नवीन घोषणा केली असून, त्यामध्ये प्रत्येक घरावर सौर पॅनेल बसविले जाणार आहे. त्यामुळे घरांना वीजबिल येणार नाही. एकूण ६० हजार कोटींचा प्रकल्प असून, पहिल्या टप्प्यात पाच लाख पूर्ण झाली आहेत.
....................................
फोटो :.........
शिवराजसिंह चौहान, मुख्‍यमंत्री फडणवीस, जयकुमार गोरे
.....................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd T20I: वेस्ट इंडिजला आली लहर, केला कहर! भारताचे २५० धावांचे विक्रमी लक्ष्य सहज पार केले, शे होपचे नाबाद शतक

Beed News : विद्यार्थी खरेदी-विक्रीतून बोगस संचमान्येचा महाघोटाळा; चंपावती विद्यालयात आढळले उत्तराखंडचे ३ बोगस विद्यार्थी

Ganja Farm Seized : गाढेजळगाव शिवारात गांजाची शेती उघड; ४३० झाडे जप्त, १८ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल, शेतकरी आरोपीला अटक

IND vs WI 2nd T20I: W,W,W! ज्याने आस दाखवली, त्यानेच माती खाल्ली; Mayank Yadav च्या चूकीने मॅच गेल्यात जमा, नेमकं काय घडलं?

Delhi Protest: 30 हजार जवान तैनात अन् 200 जण ताब्यात; CJPच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत काय-काय घडतंय?

SCROLL FOR NEXT